उरुळी कांचनला एक्सप्रेसचा अधिकृत थांबा करण्याची मागणी

जनार्दन दांडगे
सोमवार, 4 जून 2018

उरुळी कांचन - पुणे-दौंड रेल्वे मार्गाला उपनगरीय रेल्वे मार्गाचा दर्जा देऊन येथून जाणाऱ्या आझाद हिंद एक्सप्रेस, पटना एक्सप्रेस व चेन्नई एक्सप्रेस या गाड्यांना कायमचा थांबा द्यावा अशा मागणीचे निवेदन उरुळी कांचन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जगताप व सचिव धनंजय मदने यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे दिले. तसेच प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करून प्रयत्न करावेत यासाठी या निवेदनाची प्रत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिली आहे.

दोन वर्षांपूर्वी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झालेल्या पुणे-दौंड (७५ किलोमीटर) मार्गावरून इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह युनिट (लोकल) लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी जगताप म्हणाले, "उरुळी कांचन गावाचा वाढता विस्तार व शहरीकरण लक्षात घेऊन प्रवाश्यांच्या सेवेसाठी रेल्वे सेवेत सुधारणा होणे गरजेचे आहे. एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्याबरोबरच प्रवाश्यांच्या सोयीसाठी दोन्ही प्लॅटफॉर्मवर पिण्याचे पाणी, महिला व पुरुषांसाठी मुतारी व स्वच्छतागृह, प्रवासी थांबा शेडची लांबी वाढविणे, तिकीट खिडक्यांची संख्या वाढविणे या सुविधांच्या मागण्यांचा समावेश आहे."

उरुळी कांचन प्रवासी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन मिळाले असून, निवेदनातील मागण्यांसाठी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करून प्रवाश्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यार आहे.
- शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार, शिरूर लोकसभा मतदार संघ.

Web Title: The demand for the official Express stop at urali kanchan station