Demand for polymer nano composite material will increase in future said Dr. Manikrao Salunkhe.jpg
Demand for polymer nano composite material will increase in future said Dr. Manikrao Salunkhe.jpg

पॉलिमर नॅनो कॉम्पोझिट मटेरियलची भविष्यात मागणी वाढणार : डॉ. माणिकराव साळुंखे

पुणे :"नॅनो टेक्नॉलॉजीला पर्यावरण, संरक्षण, जीव रक्षण, वाहन निर्मिती, अंतराळशास्त्र, खेळ अशा अनेक क्षेत्रात वाढती मागणी आहे. त्यामुळे अंगभूत वैविध्याने अत्यंत उपयुक्त अशा पॉलिमर नॅनो कॉम्पोझिट मटेरियलला भविष्यात मागणी वाढेल आणि व्यवसाय संधी निर्माण होतील," असे मत भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय फॅकल्टी मॅनेजमेंट प्रोग्रॅमच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. साळुंखे बोलत होते. हा फॅकल्टी मॅनेजमेंट प्रोग्रॅम येत्या रविवारपर्यंत (ता.२१) सूरू असणार आहे. यात देश विदेशातील ८५० तज्ज्ञ, प्राध्यापक, संशोधक सहभागी झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

डॉ. साळुंखे म्हणाले,"पॉलिमर नॅनो कॉम्पोझिट मटेरियलच्या उपयुक्ततेमुळे त्याची बाजारपेठ भविष्यात दहा टक्क्यांनी वाढणार आहे. कोरोना साथीवर चालू असलेल्या संशोधनात देखील नॅनो टेक्नॉलॉजी आणि नॅनो सायन्सेसचा उपयोग आहे. याविषयी भारती विद्यापीठात देखील संशोधन चालू आहे.

मनाचिये वारी : पांडुरंगा, कशासाठी आमच्या पदरी झुरणीची वारी

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव म्हणाले,"पर्यावरण विषयक अनेक समस्या सोडविण्याच्या संदर्भात नॅनो कॉम्पोझिट विषयक संशोधनाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेक उद्योग या संशोधनाकडे आकर्षित होत आहेत. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात नॅनो टेक्नॉलॉजी संशोधनासाठी नॉर्थ कॅरोलिना ए टी अँड टी विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ यांच्यात एकत्रित काम चालू आहे. भारती विज्ञापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील नॅनो टेक्नॉलॉजी संशोधनाला पेटंट मिळाली आहेत."डॉ. के.बी. सुतार ,डॉ. सचिन चव्हाण, डॉ. डी डी मोहिते यांनी या कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com