चहा, कॉफीचे मटेरियल बॉक्‍स पुरविणाऱ्या व्यक्तीकडे खंडणीची मागणी; दोघांना अटक

खासगी कंपनीमध्ये चहा, कॉफीचे मटेरियल बॉक्‍स पुरविणाऱ्या व्यक्तीकडे खंडणीची मागणी करुन प्रत्यक्षात खंडणी घेताना दोन गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
Crime
Crimesakal
Summary

खासगी कंपनीमध्ये चहा, कॉफीचे मटेरियल बॉक्‍स पुरविणाऱ्या व्यक्तीकडे खंडणीची मागणी करुन प्रत्यक्षात खंडणी घेताना दोन गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पुणे - खासगी कंपनीमध्ये चहा, (Tea) कॉफीचे मटेरियल बॉक्‍स (Coffee Material Box) पुरविणाऱ्या व्यक्तीकडे खंडणीची मागणी (Ransom Demand) करुन प्रत्यक्षात खंडणी घेताना दोन गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी बेड्या (Police Arrested) ठोकल्या. हि कारवाई बुधवारी दुपारी दोन वाजता विमाननगर परिसरात करण्यात आली.

इफराज फिरोज शेख (वय 30, रा. जयप्रकाशनगर, येरवडा), तुषार विष्णु आढवडे (वय 36, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार आसिफ ऊर्फ बबलु युसूफ खान (रा. येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, वारजे माळवाडी येथील 24 वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा चहा, कॉफीचे मटेरीअल बॉक्‍स पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. त्यानुसार, ते 15 एप्रिल रोजी विमाननगर येथील विकफिल्ड इमारतीमधील बजाज फायनान्स कंपनीमध्ये चहा, कॉफीचे बॉक्‍स देण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील प्रवेशद्वारावर आरोपींनी फिर्यादीची गाडी अडविली. "तु स्वत: चहा, कॉफी मटेरियलचे बॉक्‍स नेवून ठेवले तरी, मला प्रत्येक ट्रिपमागे 500 रुपये प्रमाणे द्यावे लागतील. तू जोपर्यंत पैसे देणार नाही, तोपर्यंत तुझी गाडी आत जाऊ देणार नाही,' अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर त्यांनी फिर्यादींना तेथून बाहेर काढले. त्यानंतर 18 एप्रिलला आसिफ खान याने फिर्यादीस फोन केला.

प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपयांची खंडणी त्याने मागितली. त्यानंतर फिर्यादीने खंडणीविरोधी पथकाकडे याबाबत तक्रार केली. दरम्यान, बुधवारी दुपारी 2 वाजता फिर्यादी हे दोन हजार रुपयांच्या बनावट नोटेवर दोन पाचशे रुपयांच्या नोटा घेऊन संबंधीत कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ गेले. त्यावेळी तेथे हजर असलेल्या इफराज शेख व तुषार आढवडे यांनी फिर्यादीकडून पैसे घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. तर आसिफ खानचा शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com