सिध्देश्वर निंबोडी येथील बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी

संतोष आटोळे
सोमवार, 16 एप्रिल 2018

शिर्सुफळ (पुणे) : सिध्देश्वर निंबोडी (बारामती) येथील पारवडी कडुन येणाऱ्या ओढ्यावर बांधण्यात आलेले बंधाऱ्यामध्ये तसेच पुढे मदनवाडी तलावात खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी सरपंच मनिषा फडतरे, उपसरपंच नितीन विधाते यांच्यासह ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे.

या ओढ्यावरील बंधारे तसेच मदनवाडी तलावात पाणी सोडल्यास गावाच्या पाणी पुरवठा योजनेसह गावचा पाणीप्रश्न, आसपासच्या परिसरातील चारा पिकांसह इतर पिकांच्यासाठी याचा फायदा होणार आहे. 

सन 1972 च्या दुष्काळात बांधण्यात आलेला व सुमारे 170 हेक्टर क्षेत्रात पसरलेला मदनवाडी तलावात दरवर्षी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर अडविले जाते.त्यानंतर खडकवासला कालव्यातुन येणाऱ्या पाण्याचा आधार या तलावाला असतो. यामध्ये शेटफळकडुन तसेच पारवडीकडुन पाणी सोडण्याचे मार्ग आहेत. पारवडी कडुन येणाऱ्या ओढ्यावर गावच्या हद्दीत चार बंधारे आहेत ते चारही बंधारे कोरडे पडले आहेत.तसेच मदनवाडी तलावाच्या पाणीपातळीतही घट झाली आहे.

खडकवासला कालव्याच्या मागील आवर्तनावेळीही या तलावात चांगला पाणीसाठा करण्यात आला नव्हता याचा परिणाम या भागातील शेती व्यवसायावर झाला.चारा पिकांसह, ऊस, फळबागा आदी पिके आगामी काळात धोक्यात येणार आहेत.यासह पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचाही सामना करावा लागणार आहे.यामुळे सध्या खडकवासला कालव्यातुन सोडण्यात आलेल्या पाण्याच्या माध्यमातुन, बंधारे, तलाव प्राधान्याने भरण्याची मागणी माजी सरपंच किशोर फडतरे, माजी उपसरपंच सुनिल उदावंत, संपत सवाणे, संतोष नगरे, धनंजय धुमाळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांमधुन होत आहे.
 
Web Title: demand for release water into siddheshwar nimbodi storage