वडेश्वर रस्त्यावरची धोकादायक झाडे काढण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

टाकवे बुद्रुक - आंदर मावळाला शहराशी जोडणाऱ्या फळणे फाटा वडेश्वर रस्त्याला माऊ जवळ दोन मोठी झाडे धोकादायक स्थितीत आहे, या झाडांच्या मुळया उघड्या पडल्या असून, ही जुनी झाडे सोसाटय़ाच्या वा-यात कधfही उन्मळून पडतील अशी भीती या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाने या दोन धोकादायक झाडांची पाहणी करून ती तातडीने काढण्याची गरज अनेक प्रवाशांनी बोलून दाखवली आहे. सध्या या परिसरात पर्यटनाच्या निमित्ताने प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. दिवसभरात शेकडोंच्या संख्येने दुचाकी व चारचाकी वाहने धावत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहे. 

माऊ गावाच्या नजीक सुमारे पन्नास वर्षांपूर्वी लावलेली चिंचेच्या झाडाच्या बुंध्थाशी आणि पायथ्याशी असलेली माती कधीच वाहून गेली. मुळया उघड्या पडल्या आहेत, जोराच्या वा-यात ही झाडे हेलकावे खात आहे. पावसात अशी झाडे अनेक वेळा उन्मळून पडली आहे, पण ही झाडे मुख्य रस्त्याला असल्याने प्रवासी भीती व्यक्त करीत आहे. 

Web Title: Demand for removal of dangerous trees on Vadeshwar road