पिंपळे गुरव येथे साईड पट्ट्या खचल्या, रस्ता दुरूस्तीची मागणी

रमेश मोरे
शुक्रवार, 29 जून 2018

जुनी सांगवी (पुणे) : रस्त्याच्या साईड पट्ट्या खचल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक रस्त्याचे खोदाई काम काही दिवसांपुर्वी करण्यात आले होते. त्याजागी पालिका प्रशासनाकडुन खडी टाकुन खोदकामांचे चर भरण्यात आले. मात्र जड वाहने रस्त्यावरून गेल्यास याभागातील रस्ते खचल्याने मोठ्या गाड्या फसण्याचे प्रकार वाढले आहेत. गाड्या अडकुन राहिल्याने वहातुककोंडी होवुन रहदारीस अडथळा होत आहे. याच भागात शाळा असल्याने शाळकरी मुलांना रहदारीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे चारचाकी वाहने खचत आहेत.

जुनी सांगवी (पुणे) : रस्त्याच्या साईड पट्ट्या खचल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक रस्त्याचे खोदाई काम काही दिवसांपुर्वी करण्यात आले होते. त्याजागी पालिका प्रशासनाकडुन खडी टाकुन खोदकामांचे चर भरण्यात आले. मात्र जड वाहने रस्त्यावरून गेल्यास याभागातील रस्ते खचल्याने मोठ्या गाड्या फसण्याचे प्रकार वाढले आहेत. गाड्या अडकुन राहिल्याने वहातुककोंडी होवुन रहदारीस अडथळा होत आहे. याच भागात शाळा असल्याने शाळकरी मुलांना रहदारीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे चारचाकी वाहने खचत आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार करावीत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमरसिंह आदियाल यांनी केली आहे. 

पावसात साईड पट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्या आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांना याचा अंदाज न आल्याने गाड्या रुतून बसण्याचे प्रकार घडत आहेत. नागरीकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेकडून या खचलेल्या साईडपट्ट्यांवर फक्त खडी टाकली जात आहे. त्यामुळे चारचाकी गाड्या त्यामध्ये रुतून बसून अपघात होत आहेत. पिंपळे गुरव परिसरातील  कामे सुरु असलेल्या ठिकठिकाणी असे प्रकार घडत  आहेत. कामे सुरु असलेले रस्ते हे रहदारीचे रस्ते आहेत. या रस्त्यावरून ट्रक, शाळेच्या बस, कंटेनर अशी मोठी वाहने ये-जा करत असतात.  

पावसामुळे चारचाकी वाहने खचत आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार करावीत, रस्ते खोदाईची कामे तात्काळ बंद करून नागरीकांची गैरसोय टाळण्यात यावी. रस्त्याच्या कामामुळे बस वाहतुकीलाही मोठा  फटका बसला आहे. ऐन शाळा-महाविद्यालये सुरु होण्याच्या काळात ही कामे सुरु आहेत. ती तात्काळ बंद करून विद्यार्थी, चाकरमानी, पालक आदींची वहातुककोंडीच्या त्रासातुन मुक्तता करावी अशी नागरीकांमधुन मागणी होत आहे.

Web Title: demand to repair road in pimpale gurav