'व्हॅलेनटाईन डे' येतोय; गुलाब देतोय प्रेमाची साक्ष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

मार्केट यार्ड (पुणे) : व्हॅलेनटाईन डे आणि गुलाबाच्या फुलाचे जवळचे नाते आहे. व्हॅलेनटाईन डे'चा आठवडा म्हणजे प्रेमी युगलासांठी उत्सवच असतो. येत्या शनिवारी (ता. 14) 'व्हॅलेनटाईन डे' आहे. या दिवशी प्रेमाच्या आणाभाका मारत गुलाबाचे फुल देण्याची प्रथा आहे. याच पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्डातील फुल बाजारात विविध प्रकारच्या गुलाबांना मोठी मागणी वाढली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागणी वाढल्याने फुलांच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 40 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. रविवारी घाऊक फुल बाजारात दर्जानुसार फुलांच्या 20 नगास 160 ते १८० रुपये भाव मिळत असल्याची माहिती अखिल फूलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर यांनी दिली. तर किरकोळ बाजारात एक फुल २० रुपयांना मिळत आहे. मागील रविवारी गुलाबास 120 ते 140 रुपये भाव मिळाला होता. गेल्या वर्षी साधारणपणे 200 रुपये भाव मिळत होता. तो यंदा ही मिळेल. पुढील दोन दिवसात अजून भाव वाढेल. फुल बाजारात गुलाबाची मोठी आवक वाढली आहे. जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर तालुक्‍यातून बाजारात गुलाबांची आवक होत आहे. तसेच राज्यात नागपूर, गुजरातमध्ये सुरत, बडोदा, इंदौर, हैदराबाद, दिल्ली येथे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. व्हॅलेनटाईन डे ला आणखी चार दिवस आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी माल राखून ठेवला आहे.

संघनेते पी. परमेश्वरन यांचे निधन; मोदी, शहा यांच्यासह अनेकांची श्रद्धांजली

पुढील दोन दिवसात आणखी आवक वाढेल असे वीर यांनी सांगितले. साध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे इमेज तसेच व्हिडीओद्वारे प्रेम व्यक्त करण्याचा ट्रेण्ड वाढत आहे. सध्या बाजारात गुलाबांना मागणी आहे. मात्र, ती अपेक्षेपेक्षा कमी आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाच्या तुलनेत भाव कमी मिळतो. त्यातच या पिकाची निगा राखावी लागते. त्यामुळे शेतकरी गुलाबाची लागवड कमी प्रमाणात करत आहेत. नेहमीच्या तुलनेत 70 टक्केच लागवड केली जात असल्याचे प्रसिध्दी प्रमुख सागर भोसले यांनी सांगितले. बाजारात पांढऱ्या, पिवळ्या इतर रंगाच्या फुलांनाही मागणी आहे. या फुलांना भाव लाल गुलाबापेक्षा जास्त मिळाले असून, 20 नगांना 200 रुपये भाव मिळाले. - अरुण वीर, अध्यक्ष, अखिल फूलबाजार अडते असोसिएशन.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for roses increased on Valentine Day In Pune Maraket Yard

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: