कात्रज बसस्थानक हलविण्याची मागणी

Katraj-Bus-Depo
Katraj-Bus-Depo

पुणे - कात्रज चौकातील वाहतुक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी पीएमपी बसस्थानक तातडीने स्थलांतरित करावे, अशी मागणी नगरसेविका मनीषा राजाभाऊ कदम यांनी केली. या संदर्भात त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली.

त्या वेळी महापौर मोहोळ यांनी बसस्थानक हलवून त्याची ते आरक्षित जागेत किंवा महापालिकेच्या इतर जागेत उभे करावे, अशी सूचना आयुक्तांना केली. 

पीएमपीचे बसस्थानक हे कात्रज जकात नाका येथे आहे. तेव्हा वाहतुकीचे प्रमाण कमी होते. परंतु दहा वर्षांत चौक व परिसरात परिस्थिती बदलली आहे. बसस्थानक रस्त्याला लागून आहे. बस येणे व जाणे या मुळे गर्दीमध्ये भर पडते. तसेच बसस्थानक उंचावर असल्याने अनेकदा अपघात होतात. यापूर्वी प्रवासी बसखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशा घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे ते शिंदेवाडी येथील जकात नाक्‍याच्या शेजारील पालिकेच्या जागेवर अथवा कात्रजच्या पुढे पीएमपी आगारासाठी आरक्षित जागेवर हलवावे, अशी त्यांनी मागणी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com