
छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेमुळे गड, किल्ले पाहण्याच्या, ऐतिहासिक वैभव अनुभवण्याच्या इच्छेने अनेक युवक विविध किल्ले, दुर्ग, गडकोटांवर आदरयुक्त व अभ्यासपूर्ण अशी भटकंती करीत असतात. या वास्तू उभारण्यासाठी व टिकवण्यासाठी हजारोंनी आपले प्राण पणाला लावले आहेत याची आठवण त्यांच्या मनात सतत असते.
कोथरूड - छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेमुळे गड, किल्ले पाहण्याच्या, ऐतिहासिक वैभव अनुभवण्याच्या इच्छेने अनेक युवक विविध किल्ले, दुर्ग, गडकोटांवर आदरयुक्त व अभ्यासपूर्ण अशी भटकंती करीत असतात. या वास्तू उभारण्यासाठी व टिकवण्यासाठी हजारोंनी आपले प्राण पणाला लावले आहेत याची आठवण त्यांच्या मनात सतत असते, परंतु ऐतिहासिक स्थळावर गेल्यावर तेथील वास्तूंना पोचविलेली हानी पाहिली, की अनास्था दाखविणाऱ्यांबद्दल मनात संताप येतो, त्यामुळे गडकिल्ल्यांच्या पावित्र्याला हानी पोचविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिव-श्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शिव-श्री प्रतिष्ठानचे संस्थापक सागर शेडगे म्हणाले की, प्रतिष्ठानच्या सदस्यांनी रविवारी छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ला खांदेरी-उंदेरी बघायला जायचे ठरवले. त्यासाठी पहाटे चार वाजायच्या आतच बसस्थानकावर गेलो. उंदेरीचा किल्ला सध्या बंद आहे. खांदेरी हा जलदुर्ग. पूर्ण पाण्याने वेढलेल्या या किल्ल्याबद्दलची माहिती वाचून त्याबद्दल खूपच उत्सुकता निर्माण झाली होती.
पुणेकरांनो कोरोनाला इथेच रोखा; वाचा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आम्ही बोटीत जाऊन बसलो. सोबत फारसे लोक नव्हते. त्यामुळे या भागात किल्ला बघायला फारसे लोक येत नसावे असे वाटले, पण बोटीतून उतरताच भ्रमनिरास झाला. समोर लोकांची बेफाम गर्दी. सगळेच दारूच्या धुंदीत असलेले. एवढ्या लांबचा प्रवास करुन आम्हाला तेथे काय पाहायला मिळाले तर किल्ल्यामधील वेगवेगळ्या शेडमध्ये टोळक्याने आलेले लोक. जे सोबत दारुची खोकी आणि स्पिकरच्या भिंती घेऊन आले होते.
कानठळ्या बसतील अशा आवाजात बेधुंद होऊन नाचत होते.
Edited By - Prashant Patil