मावळातून एसटी बसची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

तळेगाव स्टेशन - येत्या आषाढी वारीसाठी मावळ तालुक्‍याच्या विविध भागांतून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी तीन विशेष एसटी बस सुरू करण्याची मागणी मावळ तालुका पारायण सोहळा समितीने तळेगाव आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मावळ तालुक्‍याला प्राचीन वारकरी परंपरा आहे. शेतीची कामे ऐन वारीच्या काळातच असल्यामुळे इच्छा असूनही भाविकांना पायी वारी करता येत नाही. त्यामुळे वारकरी एकादशीला खासगी वाहनाने पंढरपूरला जातात. परिसरातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन परिवहन मंडळाच्या तळेगाव आगाराने मावळातील टाकवे बुद्रुक, कामशेत, पवना नगर येथून पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस सुरू कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी समितीचे ज्येष्ठ सल्लागार ज्ञानेश्वर साबळे, शांताराम ढाकोळ, गणपत फुगे, राजू आसवले, तालुका अध्यक्ष बाळासाहेब मालपोटे, कार्याध्यक्ष योगेश चोपडे, सचिव सुभाष भांडे, सरचिटणीस बाळासाहेब मोहिते, धोंडिभाऊ घोजगे, गुलाब तिकोने आदींसह वारकरी उपस्थित होते. प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला थेट गावांतून पंढरपूरला जाण्यासाठी जादा बसची सोय करणार असल्याचे प्रभारी आगार व्यवस्थापक वसंत आरगडे यांनी सांगितले.

Web Title: Demand for ST bus from maval