कुंभारबावडी भाजी मार्केटबाबत करण्यात आली 'ही' मागणी

kumbharbavdi market.jpg
kumbharbavdi market.jpg

कॅन्टोन्मेंट (पुणे) : मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, बोर्ड प्रशासनाच्या आदेशामुळे पुर्ण कॅन्टोन्मेंट एरिया बंद आहे. सध्या केंद्र शासन व राज्य शासनाच्या आदेशामुळे ८ जून २०२० पासून काही नियम पाळून सर्व भाग उघडण्यात येत आहे. तरी गेल्या तीन महिन्यांपासून कुंभारबावडी भाजी मार्केट पूर्णपणे बंद असल्याने स्थानिक नागरिकांसह  विक्रेत्यांनाही  हाल सोसावे लागत आहे. त्यामुळे मार्केट पुन्हा सुरु व्हावे अशी मागणी विक्रेत्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ अमितकुमार यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे.

गेली ३० ते  ४० वर्षांपासून ३०० व्यापारी येथे व्यवसाय करीत आहेत. कॅन्टोमेंटमध्ये राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी कुंभारबावडी भाजी मार्केट हा एकच पर्याय आहे. दिनांक ५ जून २०२० रोजी बोर्डाच्या निर्णयानुसार महात्मा गांधी रस्ता, जनरल थिमय्या मार्गाच्या एक बाजू (ईस्ट स्ट्रिट) दस्तूर मेहेर रोड, सरदार वल्लभभाई मार्ग, कोळसा गल्ली, एक्झिबिशन स्ट्रीट, ताबुत स्ट्रिट, बुटी स्ट्रिट, साचापिर मार्ग स्ट्रिट, मोलेदिना मार्ग, कॉन्व्हेंट स्ट्रीट, सोलापूर रस्ता, घोरपडी बाजार रस्ता, या रस्त्यावरील दुकाने चालू करण्याकरिता नियमाप्रमाणे परवानगी दिली आहे. मात्र, एम जी. रोडवरील कुंभारबावडी भाजी मार्केटमध्ये व्यापार करण्यास परवानगी देण्यात आली नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेकदा लॉकडाऊन स्थितीबाबत गेल्या तीन महिन्यांपासून पब्लिक नोटीस काढले जात आहे. त्यामध्ये सर्व जीवनाश्यक वस्तूंचा उल्लेख केलेला आहे. तरी देखील गेल्या तीन महिन्यांपासून बोर्डाच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. कुंभारबावडी भाजी मार्केट पूर्व भागातील नागरिकांसाठी एकच पर्याय आहे.
काही महिन्यापूर्वी गोळीबार मैदान येथे भाजीविक्रीसाठी पर्यायी जागा देण्यात आली होती. यावेळी  सोशल डिस्टन्सिंग, मास्क व  हॅन्डग्लोज वापरून व्यवसाय करण्यात आला होता. मात्र, तेथे देखील  मनाई करण्यात आली. त्यामुळे कुंभारवाडी भाजी मार्केट सुरु करावे, अशी मागणी संजय क्षीरसागर, मेहबूब शेख, जब्बार शेख, फय्याज सय्यद, सुभाष जाधव, प्रदीप शिंदे आदींनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com