बैलगाडा शर्यती सुरू करण्याची मागणी ; बैलगाडा मालक प्रतिनिधींकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

कायद्याची अंमलबजावणी करताना राज्यानुसार मतभेद करण्यात येत आहेत. राज्य सरकारने याचा फेरविचार करावा, असे निवेदनात नमूद केले आहे. याबाबत न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा बैलगाडा मालक प्रतिनिधींनी दिला आहे. 

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये अद्यापही बैलगाडा शर्यती सुरू आहेत. देशात न्यायव्यवस्था एकच असूनही महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींवर निर्बंध कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित करीत बैलगाडा मालक प्रतिनिधींनी बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

यासंदर्भात बैलगाडा मालक प्रतिनिधींतर्फे शिरूर तालुक्‍यातील मच्छिंद्र कोळेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. राज्यात बैलगाडा शर्यतींची हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. त्यामुळे छोट्या-मध्यम व्यावसायिकांना रोजगार मिळत होता. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत होती. परंतु, त्यावर बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद हिरावला आहे.

तसेच, कायद्याची अंमलबजावणी करताना राज्यानुसार मतभेद करण्यात येत आहेत. राज्य सरकारने याचा फेरविचार करावा, असे निवेदनात नमूद केले आहे. याबाबत न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा बैलगाडा मालक प्रतिनिधींनी दिला आहे. 

Web Title: Demand for starting bullock race District Collectors representation to the District Collector