शिरूर-हवेली भागात नव्याने बसमार्ग सुरु व्हावेत

जनार्दन दांडगे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

उरुळी कांचन (पुणे) : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघातील उरुळी कांचन, अष्टापूर फाटा, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, तळेगाव ढमढरे, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या भागामध्ये नव्याने बसमार्ग सुरु व्हावेत अशा मागणीचे निवेदन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे दिले.

पाचर्णे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये स्वारगेट ते उरुळी कांचन, पुणे स्टेशन ते उरुळी कांचन, वाघोली ते अष्टापूर फाटा, मनपा ते कोरेगाव भीमा-शिक्रापूर, स्वारगेट अथवा पुणे स्टेशन ते उरुळी कांचन (फक्त महिलांसाठी), महानगरपालिका भवन ते न्हावी सांडस, महानगरपालिका भवन ते तुळापूर-मरकळ, महानगरपालिका भवन ते केंदूर या मार्गांचा समावेश आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अजिंक्य कांचन उपस्थित होते.

यावेळी पाचर्णे म्हणाले,"स्वारगेट ते उरुळी कांचन व पुणे स्टेशन ते उरुळी कांचन या दोन्ही मार्गांवर येत्या पंधरा दिवसांच्या कालावधीत बससेवा सुरु करणार असल्याचे आश्वासन नयना गुंडे यांनी दिले. याचबरोबर पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून फक्त महिलांसाठी अनेक मार्गावर प्रायोगिक तत्वावर 'तेजस्विनी' नावाने बससेवा सुरु आहे. मे महिन्याच्या सुरवातीला महामंडळाच्या ताफ्यामध्ये एकूण ३० नवीन तेजस्विनी बसेस येणार असून, स्वारगेट ते उरुळी कांचन व पुणे स्टेशन ते उरुळी कांचन या मार्गांवर चालणाऱ्या बसेसमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारावर आम्ही सुचविलेल्या मार्गावर महिलांसाठी बससेवा सुरु करण्यात येणार असल्याचे गुंडे यांनी स्पष्ट केले आहे."

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand for starts the new bus roots in shirur haveli