जुन्नर- पेमदरा, शिंदेवाडीला टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी

जुन्नर- पेमदरा, शिंदेवाडीला टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी

जुन्नर (पुणे) : परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने पाच धरणे असलेल्या जुन्नर तालुक्यात यावर्षी आक्टोबर महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

पेमदरा व शिंदेवाडी या दोन गावासह 30 वाड्या-वस्त्यांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी पंचायत समितीकडे केली आहे. सरपंच रंगनाथ बेलकर व अक्षदा अमोल शिंदे यांनी पाठविलेले टँकर प्रस्ताव प्राप्त झाले असून पुढील कार्यवाहीसाठी ते तहसीलदार कार्यालयाकडे सादर केले असल्याचे यांत्रिकी विभाग प्रमुख आत्माराम कसबे यांनी सांगितले.

या दोन्ही गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीचे पाणी आटले आहे. पेमदारा गावात शासकीय 10 तर शिंदेवाडीला 11 विधंनविहिरी आहेत त्यांचे पाणी देखील कमी झाले आहे तर परिसरातील चोळीचा बंधारा कोरडा पडला आहे.यामुळे एक ते दोन किलोमीटर परिसरातील पाणी असणाऱ्या विहिरीचा सद्या ग्रामस्थांना आधार आहे. या भागातील सुमारे चार हजार लोकवस्तीला पाणी टंचाईच्या झळा बसत असून लवकरात लवकर टँकरने पाणी पुरवठा सुरू व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पाळीव जनावरांच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.

तालुक्यात मागील वर्षी 23 मेला सात टँकरने सुरू केलेला पाणीपुरवठा 30 जून पर्यंत सुरू होता. तालुक्याचा पूर्व व पश्चिम भाग तसेच दुर्गम वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. 5 गावे व 76 वाड्या वस्त्यावरील 12 हजाराहून अधिक लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून होती.

यावर्षी पाणी टंचाईची समस्या ऑक्टोबरच्या सुरवातीला जाणवू लागल्याने ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याने तालुक्यासाठी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com