जुन्नरकरांना पाहिजे ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा...

corona1
corona1

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, तालुकाध्यक्ष साईनाथ ढमढेरे, उपाध्यक्ष दिलीप खिलारी, विकास मोरे, मयूर वाळूंज, सुनील शिंदे आदींनी जुन्नरचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांना दिले आहे. अनेकदा अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी थेट पुण्याला न्यावे लागते. त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी कोविड केअर सेंटरसाठी तातडीने ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे. जुन्नरचे उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी यांनी देखील अशाच आशयाची मागणी केली आहे. 

सध्या जुन्नर तालुक्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत झपाट्याने होणारी वाढ चिंताजनक ठरत आहे. लेण्याद्रीला गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी असणाऱ्या सुविधा मर्यादित आहेत. खासदार डाॅ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी या कोवीड सेंटरची उभारणी केली आहे. मात्र, सर्व सुविधा उपलब्ध नाहीत. तालुका पातळीवर सुसज्ज अशा कोवीड सेंटरची आज खरी गरज आहे. कोवीडच्या गंभीर रूग्णाला पुणे येथे पाठवावे लागते, परंतु त्याठिकाणी बेड उपलब्ध होत नसल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे पुणे येथील ससून व पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रूग्णालयात जुन्नर येथील रूग्णांसाठी बेड आरक्षित, असावेत अशीही मागणी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com