महावितरणने `त्या` ग्राहकांचे वीज बिल...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

रोजगारच बंद असल्यामुळे नागरिकांकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे.

पुणे : पर्वती मतदार संघामध्ये झोपड्डीपट्टी जास्त आहे. यामध्ये हातावर पोट असणारे नागरिक भरपूर प्रमाणात आहेत. सध्या लॉकडाउनमध्ये येथील नागरिकांकडे रोजगार नाही. रोजगारच बंद असल्यामुळे नागरिकांकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे.

आणखी वाचा- लाॅकडाउन वाढणार; पण...

घर कसे चालवायचा हा प्रश्न सध्या या नागरिकांसमोर आहे. या नागरिकांना सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सामाजिक संस्थांकडून घर चालवण्यासाठी मदत होत आहे. आता घरातील विजेचे बील हे मोठ्या प्रमाणात येईल. हे बील कसे भरायचे असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.

कुत्र्याच्या हल्ल्यात `त्याने` गमावला जीव

सध्या तरी या झोपडपट्टीतील नागरिकांची वीज बील भरण्याची परिस्थिती नाही आहे. महावितरणने वीज बील सरसकट माफ करावे अशा मागणीचे निवेदन प्रभाग क्रमांक २९ चे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी पर्वती महावितरणचे अधिकारी सायर दराडे यांच्याकडे दिले आहे. महावितरणकडून कारवाईसाठी हे निवेदन पुढे पाठविण्यात आलेले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राष्ट्रवादीचे पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष नितिन कदम, खासदार वंदना चव्हाण, नगरसेविका आश्विनी कदम यांच्याकडे यांचा पाठपुरावा करण्यात आला आहे. याबाबत नितिन कदम यांनी सांगितले की, ही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. नागरिकांचे वीजबील माफ करण्यासाठी प्रयत्न केले जातील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for waiver of electricity bill in parvati