लिंगे यांच्या हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी

संदीप जगदाळे
शनिवार, 5 मे 2018

ज्येष्ठ समाजसेवक व महात्मा फुले विचार प्रसारक, अखिल भारतीय माळी महासंघ अध्यक्ष शंकरराव लिंगे यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला करुन त्यांचे कपडे फाडले, त्यांच्या अंगावर काळी शाई फेकली.

हडपसर : ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांच्या हल्लेखोरांना चोवीस तासांत अटक करा, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून करण्यात आली आहे.  

ज्येष्ठ समाजसेवक व महात्मा फुले विचार प्रसारक, अखिल भारतीय माळी महासंघ अध्यक्ष शंकरराव लिंगे यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला करुन त्यांचे कपडे फाडले, त्यांच्या अंगावर काळी शाई फेकली. लिंगे हे मागासवर्गीय आयोग महाराष्ट्र राज्य याना निवेदन देण्यासाठी गेला असता, हा भ्याड हल्ला करुन हल्लेखोर फरार झाले. त्यामुळे या हल्लेखोरांवर त्वरित कार्यवाई करून त्यांना अटक करावी, त्यांच्यावर खटला चालवावा, अशा स्वरुपाचे निवेदन तहसीलदार हेमंत निकम यानां सर्व समता सैनिक यानी दिले. 

यावेळी माजी आमदार कमलताई ढोले, मुकेश वाडकर ,विठ्ठल सातव, महेंद्र बनकर, संजय सातव, महेश ससाणे, अॅड. के टी आरु, मंजिरी धाडगे, रूपाली चाकनकर, प्रितेश गवळी, अविनाश चौरे, अभिजीत बोराटे, अजित ससाणे,शांताराम जाधव, पंढरीनाथ बनकर, राजेन्द्र नेवसे, भानुदास शिंदे, शिवराम जांभुळकर ,सुनीता शिलवंते, युवराज भुजबळ, समीर धाडगे, राजेन्द्र शीलवंत व सर्व समता सैनिक उपस्थित होते. सदर निवेदन तहसीलदार हेमंत निकम यांना देण्यात आले.

Web Title: Demanded arrest of Lieges attackers