सुदृढ लोकशाहीसाठी मतदान

I Will Vote
I Will Vote

पुणे - जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाचे आम्ही जबाबदार नागरिक आहोत. त्यामुळे चांगले भविष्य घडविण्यासाठी आणि लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मतदान करूच, अशी शपथ ‘एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स’च्या विद्यार्थिनींनी घेतली.

‘सकाळ’च्या ‘आय विल व्होट’ उपक्रमाअंतर्गत एसएनडीटी विद्यापीठात विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. उपजिल्हाधिकारी विजय देशमुख यांनी मतदानाचे महत्त्व सांगून ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राची माहिती दिली. ‘सकाळ’चे मुख्य बातमीदार संभाजी पाटील यांनी उपक्रमाची भूमिका विशद केली. प्राचार्या डॉ. मुक्तजा मठकरी यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे आवाहन केले. या वेळी प्रा. अनुजा किणीकर उपस्थित होत्या.

अवनी कवडे, विद्यार्थिनी - मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. मैत्रिणींनाही मतदान करायला सांगणार  आहे. 

मानसी वखारिया, विद्यार्थिनी - आपल्याला टीका करायला खूप आवडते; परंतु मतदान केले, तरच आपण टीका करू शकतो. त्यामुळे सर्वांनी मतदान केले पाहिजे. 

कृपा आडपवार, विद्यार्थिनी - आपण मतदान करून चांगला नेता निवडून दिला, तर आपले भविष्य आपणच बदलू शकतो. भविष्यातील समस्याही दूर होतील.

विजय देशमुख, उपजिल्हाधिकारी - आपण विचार करतो, टीका करतो; पण मतदानाचा हक्क बजावत नाही. मग निकालानंतर कुणावरही टीका करण्याचा अधिकारही तुम्हाला राहात नाही. त्यामुळे मतदान करून योग्य व्यक्तीला निवडून द्यावे.

डॉ. मुक्तजा मठकरी, प्राचार्य, गृहविज्ञान महाविद्यालय - लोकशाही सुदृढ करण्याची जबाबदारी  आपली आहे. यासाठी मतदान करूया.

अश्‍विनी कुलकर्णी, अभिनेत्री - आपण जबाबदार असतोच; पण मतदान केले, तर त्यावर शिक्कामोर्तब होते. त्यामुळे तुम्ही मतदान करा आणि जबाबदार  नागरिक असल्याचे दाखवून द्या. मी शूटिंगमधून सुटी घेऊन मतदान करते.

मोहिमेत सहभागी व्हा!
पुण्यातील शैक्षणिक संस्थांसह विविध ठिकाणी I will Vote हा उपक्रम घेतला जाणार आहे. त्यात प्रत्येक मतदाराने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सकाळ’ करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com