मुदतवाढ देऊनही पाचशेच्या नोटांना नकार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

पुणे : शहरातील पेट्रोल पंप, वीजबिल भरणा केंद्र, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये शुक्रवारी पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात आला.

बहुतांश एटीएम बंद असल्यामुळे नागरिकांनी पाचशेच्या नव्या व शंभर रुपयांच्या नोटा घेण्यासाठी बॅंकांमध्ये गर्दी केली. तसेच, जुन्या नोटा भरण्यासाठी व नव्या घेण्यासाठी एकच रांग ठेवण्यात आल्यामुळे बॅंकांबाहेर गर्दी असल्याचे चित्र शुक्रवारी दिसत होते. 

चलनातून हजार रुपयांच्या नोटांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी रात्री जाहीर केला, त्यामुळे आता एक हजार रुपयांच्या नोटा बॅंकांमध्ये फक्त जमा करता येणार आहेत. या नोटा खपविण्यासाठी पेट्रोल पंपांवर गुरुवारी रात्री मोटारचालकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. दुसरीकडे, पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारात वापरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली असतानाही शहरातील व्यावसायिकांनी त्या स्वीकारण्यास नकार दिला, त्यामुळे नागरिकांची काही प्रमाणात अडचण झाली. 

नव्या पाचशे रुपयांच्या नोटा शहरातील बॅंकांच्या शाखांमध्ये दाखल झाल्या आहेत; मात्र या नोटा मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आलेल्या नाहीत. यापूर्वी बॅंकांमध्ये आलेल्या दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा घेण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे त्या नोटा पडून राहतील, अशी भीती बॅंक अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे आधी दोन हजार रुपयांच्या नोटांचे वितरण आणि नंतर नव्या पाचशेच्या नोटांचे वितरण अशी भूमिका काही बॅंक अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्याचवेळी काही बॅंकांनी सढळहाताने पाचशेच्या नव्या नोटा ग्राहकांना देण्यास शुक्रवारी सुरवात केली. त्यामुळे या बॅंकांमध्ये पैसे काढण्यासाठीची गर्दी अधिक असल्याचे दिसून आले. 

दरम्यान, सुट्या पैशांच्या अभावी होत असलेली नागरिकांची अडचण आता कमी होऊ लागली आहे. 

लक्ष्मी रस्त्यावरील कुलकर्णी पेट्रोल पंपावर गेलो असता तेथील कर्मचाऱ्यांनी पाचशे रुपयांची नोट स्वीकारण्यास शुक्रवारी नकार दिला. तसेच, कामानिमित्त स्वारगेटजवळील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये गेलो होतो, तेथेही जुन्या पाचशेच्या नोटा घेतल्या गेल्या नाहीत. या नोटांना मुदतवाढ मिळाली असतानाही व्यावसायिकांनी नागरिकांची अडचण केली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. 
- रोहित चव्हाण, नागरिक

Web Title: Demonetisation : Petrol pumps refused to accept old notes