Pune : छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Demonstration of sports of Shiva period occasion of Chhatrapati Sambhaji Maharaj birth anniversary pune

Pune : छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक

पुणे : तलवारबाजी, दांडपट्टा असे शिवकालीन मर्दानी खेळ, लाईट आणि साऊंड शो तसेच 'स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी' या मालिकेतील कलाकारांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात कसबा पेठेतील फडके हौद चौकात साजरा करण्यात आला.

या भव्य, नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन जय भवानी सहकारी बँक संचालक राजेंद्र तरवडे, नवदीप तरुण मंडळ, शिवशक्ती प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी हेमंत रासने, हेमंत लेले, धीरज घाटे, पल्लवी जावळे, सुहास कुलकर्णी, प्रमोद कोंढरे, अॕड. मंदार जोशी, राजेंद्र काकडे, उमेश चव्हाण,अरविंद कोठारी, लक्ष्मण तरवडे ,

नवदीप तरुण मंडळ, शिवशक्ती प्रतिष्ठान, प्रभाग क्रमांक १६ आणि १७ मधील पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी आघाडी संघटना सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आयोजक राजेंद्र तरवडे म्हणाले, " छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील मंडळांनी संभाजी महाराजांची जयंती वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरी केली पाहिजे".

मर्दानी खेळ त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठान आखाडा, कसबा पेठ यांनीं सादर केले. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील बहिर्जी नाईक ( अजय तापकिरे) , हिरोजी फर्जद ( रमेश रोकडे), सिद्धी खेरत ( विश्वजित फडते) , अनाजी पंत ( महेश कोकाटे), ज्योत्येजी ( गणेश लोणारे) आदी उपस्थित होते. जयंती सोहळ्यानिमित्त आयोजकांनी अनाथांना अन्नदान केले.