हर्षल हॉल (कर्वे रस्ता) - ‘देणे समाजाचे’ प्रदर्शनाची माहिती घेताना  डॉ. अनिल अवचट.
हर्षल हॉल (कर्वे रस्ता) - ‘देणे समाजाचे’ प्रदर्शनाची माहिती घेताना डॉ. अनिल अवचट.

मी देहदान करणार - विक्रम गोखले

एरंडवणे - ‘आपण समाजाचे देणे लागतो यामुळे सर्वांनी समाजासाठी योगदान दिले पाहिजे. मी आणि माझ्या पत्नीने मृत्यूनंतर देहदान करायचे ठरवले आहे,’’ असे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी सांगितले.

आर्टिस्ट्री संस्थेतर्फे ‘देणे समाजाचे’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. वेगवेगळ्या क्षेत्रांतील सामाजिक संस्थांचे कार्य समाजासमोर आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे उद्‌घाटन गोखले यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलते होते. ज्येष्ठ समाजसेवक व साहित्यिक डॉ. अनिल अवचट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गोखले म्हणाले, ‘‘आर्टिस्ट्री संस्थेने आयोजित केलेला हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. माझ्या ट्रस्टतर्फे मी या संस्थेला मदत करणार आहे.’’ विविध सामाजिक संस्थांच्या कार्याची ओळख २००५ पासून प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजाला दिली जात आहे. त्याचबरोबर त्यांना मदत मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सहभागी संस्थांकडून कोणत्याही शुल्काची आकारणी केली जात नसल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. या वर्षी या उपक्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या ३२ सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. ७) नागरिकांसाठी विनामूल्य खुले आहे.

समाजाप्रती आपल्या जाणिवा नेहमी जागृत असायला हव्यात. समाजातील दुर्बल आणि होतकरू लोकांप्रती सद्भावना असायला हवी.
- डॉ. अनिल अवचट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com