शहरात एकवीस दिवसांत डेंगीचे तब्बल 479 रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

पुणे - शहरात गेल्या 21 दिवसांमध्ये डेंगीचा संशय असलेली 479 रुग्ण, तर चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या 78 झाली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

पुणे - शहरात गेल्या 21 दिवसांमध्ये डेंगीचा संशय असलेली 479 रुग्ण, तर चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या 78 झाली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

शहरात यंदा डेंगीपेक्षा चिकुनगुनियाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या वर्षीपर्यंत या आजाराचे चाळीस रुग्ण आढळत होते, यंदी ही संख्या 397 पर्यंत वाढली. राज्यात चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या 21 दिवसांमध्ये या आजाराच्या 78 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण संगमवाडी आणि ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले.

राज्यात डेंगीचे सर्वाधिक रुग्ण नाशिक येथे आढळले असून, पुण्यात जानेवारीपासून आतापर्यंत दीड हजार संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 479 रुग्ण या महिन्यात आढळले आहेत. जूनपासून कीटकजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. समीर जोग म्हणाले, ""डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही त्यामुळे अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. डेंगीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी नाही.‘‘

महापालिकेतील सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत म्हणाल्या, ""डेंगी आणि चिकुनगुनिया हा एकाच डासापासून पसरणारा आजार आहे. डासांची पैदास रोखणे, हाच हे आजार नियंत्रित आणण्याचा प्रभावी मार्ग आहे. महापालिकेची यंत्रणा सक्रिय केली असून, त्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी लोकशिक्षण दिले जात आहे.‘‘ 

Web Title: Dengice twenty-one days in the city of nearly 479 patients