आळंदीत डेंगीसदृश तापाची लागण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

आळंदी - शहरातील वाढत्या मच्छरांमुळे आणि अस्वच्छतेमुळे ३० ते ४० रुग्ण सध्या डेंगीसदृश तापाने विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. नगरपालिका प्रशासन मात्र सुस्त आहे. 

आळंदी गेल्या तीन आठवड्यांत डेंगीसदृश तापाच्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. पद्‌मावती रस्ता, वडगाव रस्ता, मरकळ रस्ता, गोपाळपुरा भागात विशेष करून रुग्णांची संख्या जास्त आहे. 

सुरवातीला बारीक ताप आल्यानंतर उलटी आणि मळमळ होत असल्याचा त्रास अनेकांना होत आहे. लहान मुलेही यातून सुटले नाहीत. अनेक ठिकाणी तर संपूर्ण कुटुंबच तापाने त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. 

सध्या शहरात स्वच्छतेसाठी केला जाणारा वारेमाप खर्च पाहता आळंदीकर जनता पालिकेच्या भ्रष्ट कारभाराबाबत नाराज आहे. प्रशासन आणि कारभारी मात्र आपण त्या गावचेच नाही, अशा भूमिकेत आहेत. ठेकेदाराला महिन्याकाठी पंधरा लाख केवळ स्वच्छतेसाठी मोजले जातात. तीन पटीने ठेक्‍याची रक्कम वाढविली. मात्र अस्वच्छतेचे चित्र काही बदलले नाही. गेल्या काही महिन्यांत पालिकेने ठेकेदाराला जंतुनाशक पावडरच दिली नसल्याचे कळते.

दोन दिवसांपूर्वीच स्वच्छतेसाठी आवश्‍यक केमिकल आणि जंतुनाशक पावडर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र ठेकेदार जर काम करत नसेल तर त्यावर कारवाई करू. ज्या ठिकाणी डेंगीसदृश तापाची लागण झाली असेल त्या ठिकाणी जादाचे कर्मचारी लावण्यास ठेकेदाराला आदेश दिले जाईल.
- वैजयंता उमरगेकर, नगराध्यक्ष

नागरिकांनी जादा प्रमाणात पाणी साठवू नये. सध्या पाच धुरळणी यंत्राद्वारे गोपाळपुरा आणि पद्मावती भागात स्वच्छता केली जात आहे. आजपासून जंतुनाशक पावडरची फवारणी केली जाईल. वैद्यकीय पथकही तपासणीसाठी नेमले आहे. सध्या शहरात उष्णतेमुळे व्हायरल फिव्हरचे प्रमाण जास्त आहे. पद्मावती रस्त्यावरील सार्वजनिक शौचालय दुरुस्त केले जाईल.
- समीर भूमकर, मुख्याधिकारी

Web Title: Dengue Fever Sickness Health