डेंगीचे एका आठवड्यात आढळले 23 रुग्ण 

डेंगीचे एका आठवड्यात आढळले 23 रुग्ण 

पिंपरी - वातावरणात झालेल्या बदलामुळे येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये डेंगीची लागण झालेले 23 रुग्ण आढळले. त्यामुळे नऊ महिन्यांत (जानेवारी ते सप्टेंबर) रुग्णांचा आकडा 118वरून 141 वर पोचला आहे. 

ऑक्‍टोबर हीट आणि पाऊस अशा वातावरणामुळे डेंगीच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रुग्णांची गर्दी वाढल्याने वायसीएममध्ये उपचार करणे डॉक्‍टरांना अवघड होत आहे. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची गरज आहे. यासाठी वायसीएम प्रशासनाने वेळेत दक्षता घेणे गरजेचे आहे. 

सध्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्‌सचे कमी-जास्त प्रमाण आढळत आहे. दरम्यान, ताप, नाका-तोंडातून रक्तस्राव, रक्ताची उलटी, मळमळ, दम, अन्नपचन न होणे, असे जाणवल्यास तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. अशावेळी रुग्णांच्या शरीरात पाण्याची पातळीत वाढ होणे गरजेचे आहे; तसेच उच्च पातळीचा पोषण आहार आवश्‍यक असल्याचे डॉ. विनायक पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com