डिसेंट फाउंडेशनचा किशोरवयीन मुलींसाठी उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

जुन्नर : स्वतः बरोबर आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची वाढत चालली आहे. विशेषतः किशोरवयीन मुलींच्या वैयक्तिक स्वच्छता व शरीरात होणारे नैसर्गिक बदलाबाबत आईकडून मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे मत डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी चिंचोली (ता.जुन्नर) येथे बोलताना व्यक्त केले.

ते म्हणाले, ''मुले-मुली व पालक यांच्यातील संवाद हरवत चालला आहे. त्यामुळे मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी आईने आपल्या मुलीची चांगली मैत्रीण होणे काळाची गरज आहे."

चिंचोली येथे मुली व माता पालकांसाठी श्री समर्थ मधुकर विद्यालयात डिसेंट फाऊंडेशन, मार्तंड देवस्थान ट्रस्ट, चिंचोली व गुरुदक्षिणा सोशल वेलफेअर फाऊंडेशन, यांच्या सुयुक्त विद्यमानाने आयोजित "कळी उमलताना " या उपक्रमातर्गत किशोरवयीन मुली आरोग्य जनजागृती शिबीर व मोफत सॅनिटरी नॅपकीन वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या शिबिरात प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील ७० मुली व ११० माता पालक सहभागी झाल्या होत्या. यावेळी सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे बिडवई बोलत होते. मार्तंड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब काशीद अध्यक्षस्थानी होते. सरपंच राजश्री काशिद, सामाजिक  कार्यकर्ते उत्तम काशिद, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा कांबळे, बबन वाजे, राजेंद्र पवार, आदिनाथ चव्हाण,संतोष काशिद, फकीर आतार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ.कल्याणी पुंडे व डॉ.राजश्री इंगवले यांनी मुलींना मासिक पाळी स्वच्छता व समस्या या बाबत मार्गदर्शन केले. मुलींनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण केले. जुन्नरच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता नवघरे यांनी स्व-संरक्षण व महिला विषयक कायद्यांची माहिती दिली. प्रास्तविक संदीप पानसरे यांनी केले. विठ्ठल गाडगे यांनी 
 
Web Title: Dentist Foundation program for Teenage Girls