esakal | उपमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून बारामतीत गरजूंना मिळाला मदतीचा हात.....
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनाही किटचे वाटप

उपमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून बारामतीत गरजूंना मिळाला मदतीचा हात.....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर व तालुक्यात लॉकडाउनमुळे अनेकांपुढे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात बारामतीकरांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत समाजाच्या विविध घटकांना अन्नधान्याच्या किटच्या माध्यमातून हातभार लावण्याचा प्रयत्न केला.

युवतीला विमान चालविण्याचे प्रशिक्षण देताना 'त्याने' केले हे कृत्य; अन् मग...

 बारामती शहरातील विविध अल्पउत्पन्न असलेल्या कुटुंबियांसह रिक्षाचालक व इतर काही समाजबांधवांनाही अडचणीच्या काळात या किटचा आधार मिळाला. गहू, तांदूळ, तेल, साखर, हरभरा डाळ यांचा या किटमध्ये समावेश आहे. साधारणपणे एका कुटुंबाला आठवडाभर पुरेल इतके सामान या किटमध्ये देण्यात आले. जवळपास पाच हजारांवर लोकांना या किटचे वाटप बारामतीतील विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. आजपर्यंत दोन हजार किटचे वाटप करण्यात आले आहे. रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनाही यातील किटचे वाटप केले गेले. 

जुन्नर बाजार समितीला कोरोनाचा मोठा फटका; तब्बल...

श्रायबर डायनामिक्स, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, किशोर सराफ, सुभाष सोमाणी, प्रफुल्ल तावरे, वैभव तावरे, उध्दव गावडे, बारामती सहकारी बँकेने यात मोलाची मदत केली. दरम्यान, बारामती सायकल क्लबचे अॅड. श्रीनिवास वायकर यांच्या नेतृत्वाखाली शहर, तालुका पोलिसांसह होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या पोलिसांना दररोज दुपारी व रात्री जागेवर जाऊन जेवण दिले गेले. दररोज पोळी, भाजी, भात वरण असा मेनू असलेले 260 कंटेनर दिले गेले. क्लबचे सोळा सदस्य दररोज नित्यनेमाने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना जेवण पुरवितात. या शिवाय 750 धान्य किटचेही वाटप सायकल क्लबने केले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

 
दुसरीकडे महावीर पथ येथील राजे ग्रुपचे गणेश कदम व त्यांच्या सहका-यांनी 22 मार्चपासून 40 गरजू लोकांना दोन्ही वेळेचे जेवण पुरविण्याचे काम केले. डाळभात, पुलाव, मसालेभात, चपाती भाजी यांचा यात समावेश केला गेला. इस्कॉन परिवाराच्या वतीनेही गरजूंना नियमितपणे जेवणाचे वाटप या काळात गेले गेले. 
दरम्यान, क्रेडाई  बारामतीतील 1400 बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या वतीने दोन्ही वेळेसच्या जेवणाची सुविधा पुरविली जात आहे. क्रेडाई बारामती शाखेच्या वतीने या जेवणाच्या वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. क्रेडाईचे राज्याचे सचिव प्रफुल्ल तावरे, बारामतीचे अध्यक्ष सुरेंद्र भोईटे, भागवत चौधर, राहुल खाटमोडे, राजेंद्र खराडे यांनी यात महत्वाची भूमिका बजावली आहे.