Corona Virus : प्रायव्हेट हॉस्पिटल, शाळा-महाविद्यालयांसह हॉटेल घेणार ताब्यात; उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

विलगीकरण सुविधा नव्याने तयार करण्यासाठी खासगी रुग्णालय, शैक्षणिक संस्था अथवा हॉटेलची गरज भासल्यास एपिडिमिक ॲक्टखाली जिल्हाधिकारी यांना अधिग्रहित करण्याचे अधिकार आहेत, त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी. तसेच, ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी अतिरिक्त 55 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ती  कामे लवकरात लवकर पूर्ण करुन येत्या दोन महिन्यांत आठ ते झाल्या मजल्यापर्यंतचे काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. 

पुणे : शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. प्रशासनाने गाफील न राहता पूर्वतयारी म्हणून शहरातील खासगी रुग्णालय ,शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुण्यात महिलेचा कोरोनानं मृत्यू झाल्याची अफवा; जाणून घ्या वास्तव

विलगीकरण सुविधा नव्याने तयार करण्यासाठी खासगी रुग्णालय, शैक्षणिक संस्था अथवा हॉटेलची गरज भासल्यास एपिडिमिक ॲक्टखाली जिल्हाधिकारी यांना अधिग्रहित करण्याचे अधिकार आहेत, त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी. तसेच, ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी अतिरिक्त 55 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ती  कामे लवकरात लवकर पूर्ण करुन येत्या दोन महिन्यांत आठ ते झाल्या मजल्यापर्यंतचे काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

झोपडपट्टीतील नागरिकांसाठी सुविधा : 
झोपडपट्टी किंवा ज्या ठिकाणी नागरिकांना राहण्यासाठी छोटी घरे आहेत, अशा ठिकाणी लोक एकत्रित राहत आहेत. त्यांच्याकरिता महापालिकेमार्फत सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी या भागातील नागरिक जाऊन थांबू शकतील. परिणामी सामाजिक अंतराचे पालन होऊन कोरोना विषाणूपासून बचाव होण्यास मदत होईल.  तसेच, ज्या नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, किडनी विकार किंवा दमा असेल ,अशा नागरिकांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. त्यांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पवार यांनी केले.

लॉकडाऊन सुरुच राहणार; दिलासा नाहीच

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar order to acquire private hospitals and educational institutions along with Hotels