esakal | बारामतीतील अवैध धंदे अजितदादांच्या रडारवर
sakal

बोलून बातमी शोधा

AJIT PAVAR

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत, त्यामध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही.

बारामतीतील अवैध धंदे अजितदादांच्या रडारवर

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहर व तालुक्यातील विविध भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासह विकासकामे वेगाने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. 

अमोल कोल्हे सांगतात, कोरोनाच्या लढाईत...माझी ढाल, माझा मास्क...

अजित पवार यांनी आज बारामती शहर व तालुक्यातील विविध विकास कामांना भेटी देत अनेक सूचना केल्या. विविध कामांचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर व्हीआयआयटीमध्ये बैठक घेत त्यांनी विभागनिहायही आढावा घेतला. नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते,  महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,  तहसीलदार विजय पाटील,  गट विकास अधिकारी राहुल काळभोर,  मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ, डॉ. सदानंद काळे, डॉ. मनोज खोमणे, अरविंद जगताप, नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर आदी या वेळी उपस्थित होते.

एका लग्नाची मोठी गोष्ट...वऱ्हाडींसह नवरा- नवरीचंही जुळलं कोरोनाशी नातं 

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत, त्यामध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. विकासकामे करताना रस्त्यांचे सुशोभिकरण करणे, सेवा रस्त्यालागत झाडे लावण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे. शासकीय जागांमध्ये असणारी अतिक्रमण हटवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अवैध वाळू उपसा व अवैध व्यवसायाविरूद्ध धडक कारवाई करावी.  तसेच,कोरोनाचा प्रसार रोखण्यासह नागरिकांनी नियम व अटींचे पालन करण्याच्याही सूचना देण्याबाबतही प्रशासनाने समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.  

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामतीकरांची लॉकडाउनमधून सुटका
बारामतीत कोणताही लॉकडाउन केला जाणार नाही, हे आज प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यास नाईलाजाने काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, तूर्त तरी बारामतीत परिस्थिती जैसे थे असेल व जनजीवन सुरळीत सुरु असेल, असेही स्पष्ट करण्यात आले. 

 Edited by : Nilesh Shende