esakal | Pune Rain : उपमुख्यमंत्री अजित पवार अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकले
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

Pune Rain : उपमुख्यमंत्री अजित पवार अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोहगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बसला आहे. रात्री नऊ वाजून १० मिनीटांनी लोहगाव विमानतळावरून येरवड्याकडे येत असताना पवार अर्धातास वाहतूक कोंडीत अडकून बसले होते. अखेरीस दहा वाजता त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका झाल्याचे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.

राज्यातील दौरा आटपून विमानतळावर उतरलेले पवार नागपूरचाळ मार्गे येरवड्याकडे जाणार होते. मात्र, त्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता नव्या विमानतळ रस्त्यामार्गे ताफा वळविण्यात आला होता. मात्र काही तासांपासून परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यांना नाल्यांचे रुप प्राप्त झाल्याने नगर रस्त्यासह विमानतळ, लोहगाव धानोरी या रस्त्यावरील वाहतूक तीन तांसापासून ठप्प होती.

पवारांचा ताफा शास्त्रीनगर चौकात पोचल्यावर अर्धातास वाहतूक कोंडीत अडकला होता. सर्वच रस्त्यावर पाणी साठले असल्याने रस्ते जाम जाम झाले होते. त्यामुळे पर्यायी मार्ग नसल्याने पवारांच्या वाहनांचा ताफा ही अडकून पडला होता. अखेरीस रात्री १०च्या सुमारास पवारांचा ताफा वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यास यश आले. रात्री उशिरापर्यंत येथील रस्त्यांवर मुंगीच्या गतीने वाहतूक चालू होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

loading image
go to top