अजित पवार यांच्या बदनामीप्रकरणी शिरूरमध्ये महिलेवर गुन्हा दाखल

भरत पचंगे
Saturday, 18 July 2020

सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह टिपण्णी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी चाकण (ता. खेड) येथील एका महिलेविरुद्ध बदनामी, शिवीगाळ, असभ्य भाषा व आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

शिक्रापूर (पुणे) : सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह टिपण्णी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी चाकण (ता. खेड) येथील एका महिलेविरुद्ध बदनामी, शिवीगाळ, असभ्य भाषा व आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या महिलेवर अशाच प्रकारचा गुन्हा बुलढाणा पोलिसांकडे दाखल आहे. त्यामुळे हा तपास बुलढाणा पोलिसांच्या तपासाबरोबरच आम्ही करणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. 

बॅकलाॅगच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला पण...

याबाबत शिक्रापूर पोलिसांकडे कोंढापुरीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते स्वप्नील अरुण गायकवाड (कोंढापूरी, ता. शिरूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, ९ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाची एक बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर संगीता वाणखेडे नामक महिलेकडून एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. यात त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल असभ्य भाषेत बदनामकारक वक्तव्य केले. याबाबत स्वप्नील गायकवाड यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लाॅकडाउनमध्ये रविवारपासून पुणेकरांना दिलासा

दरम्यान, आरोपी वाणखेडे यांच्यावर अशाच पद्धतीने बुलढाणा येथेही गुन्हा दाखल आहे. त्यानुसार त्यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच गुन्ह्यात आमच्याकडे दाखल गुन्हा दाखल करून दोन्ही तपास एकत्रित करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार हे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar's notoriety on social media