अल्पभुधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला, उपशिक्षण अधिकारी.

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

उंडवडी, ता. 31 : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील अल्पभुधारक शेतकऱ्याच्या मुलाची उपशिक्षण अधिकारी पदी निवड झाली आहे. निलेश राजेंद्र गवळी असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

उंडवडी, ता. 31 : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील अल्पभुधारक शेतकऱ्याच्या मुलाची उपशिक्षण अधिकारी पदी निवड झाली आहे. निलेश राजेंद्र गवळी असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

येथील अल्पभुधारक शेतकरी राजेंद्र ज्ञानदेव गवळी यांचा मुलगा, निलेशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती. या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये निलेश राजेंद्र गवळी याला 900 पैकी 506 गुण मिळाल्याने त्याला लोकसेवा आयोगाने उप शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. निलेशने पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले, तर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण वासुंदे (ता. दौंड) येथे घेतले. अकरावी - बारावीचे शिक्षण बारामती येथील टीसी कॉलेजला तर विद्या प्रतिष्ठानला मेकॅनिकल डिग्रीचे शिक्षण घेतले. 

पदवीनंतर निलेशने केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग या दोन्हीकडे परीक्षेसाठी आभ्यास करून प्रयत्न केला होता. मात्र गेल्यावर्षी दोन्हीही परिक्षेत गुण कमी मिळाल्याने त्याची संधी गेली होती. मात्र यामध्ये निराश होवून व खचून न जाता, निलेशने पुन्हा जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून यावर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली.  यामध्ये त्याला यश आले आणि तो उप शिक्षण अधिकारी झाला.     

याबाबत बोलताना निलेश गवळी म्हणाला, ''माझ्या या यशात, माझ्या आई- वडीलांचा मोठा वाटा आहे. कारण शिक्षणासाठी खर्चाबरोबरच घरातून मानसिक बळही महत्वाचे असते. ते घरातून मिळाल्याने मी हे यश संपादन करु शकलो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही चांगला आभ्यास करून स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत. दोन पर्याय ठेवून प्रयत्न केल्यानंतर यश निश्चितपणे मिळते. '' 

 

Web Title: Deputy Education Officer, who was a minor, became a farme