संत नामदेव महाराजांच्या 17 व्या वंशजांचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

दरवर्षी कार्तिक द्वादशीला पंढरपूर येथून श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे आळंदी कडे प्रस्थान होत असते. या परंपरेनुसार हा पायी पालखी सोहळा आळंदी कडे निघाला होता. सोपान महाराज नामदास यांच्यासह शेकडो वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले होते.

पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यात ब्रेक निकामी झालेला जेसीबी घुसल्याने झालेल्या अपघातात संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान तुळशीदास नामदास यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे येथील वारकरी फडकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे. सोपान महाराज नामदास यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) मंगळवारी सायंकाळी आळंदी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दरवर्षी कार्तिक द्वादशीला पंढरपूर येथून श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे आळंदी कडे प्रस्थान होत असते. या परंपरेनुसार हा पायी पालखी सोहळा आळंदी कडे निघाला होता. सोपान महाराज नामदास यांच्यासह शेकडो वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले होते. काल सोमवारी या दिंडीचा सासवड येथे मुक्काम होता आज पहाटे पालखी सोहळा हडपसर कडे निघाला होता. त्या दरम्यान अपघाताची दुर्दैवी घटना घडली.

पुण्याजवळ वारकऱ्यांवर काळाचा घाला; दोन वारकऱ्यांचा मृत्यू

सोपान महाराज नामदास हे दरवर्षी या सोहळ्यात सहभागी होत असत. सांप्रदायिक प्रथे बरोबरच ते पारंपारिक शिंपीकाम देखील उत्तम पद्धतीने करत असत. सोपान महाराज नामदास यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा तसेच भाऊ ज्ञानेश्वर महाराज नामदास तसेच एकनाथ महाराज नामदास असा परिवार आहे.

हिंमत असेल तर या अंगावर, आम्ही तयार आहोत; शिवसेनेचे थेट आव्हान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: descendant of Sant Namdev Maharaj died in an accident near pune