पुणे : मार्केट यार्डातील बंद विभाग सुरू करण्याबाबत देशमुख म्हणतात...  

market-yard.jpg
market-yard.jpg

मार्केट यार्ड : गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी, फळे, कांदा-बटाटा, केळी आणि पान विभागातील व्यापारी आणि कामगार कोरोना बाधित भागात रहात होते. त्यामुळे खबरदारी म्हणून हे विभाग बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला होता. मात्र आता योग्य त्या उपाययोजना करून बंद विभाग सुरू करण्याबाबत अडते, हमाल, तोलणार आणि टेम्पो चालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांची चर्चा करण्यात आली आहे. सर्व संघटना बाजार सुरू करण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती प्रशासक बी.जे. देशमुख यांनी दिली.

मंगळवारी बाजार समितीच्या कार्यालयात बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांच्या उपस्थितीत अडते, हमाल, तोलणार, टम्पो चालक पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत योग्य ती खबरदारी घेवून बाजार सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष राजेंद्र कोरपे, कामगार युनियनचे अध्यक्ष विलास थोपटे, टेम्पो चालक संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, "सर्व संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच काही पर्याय या पदाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. या पर्यायावर सर्व घटक विचार करतील. गुरूवारी पुन्हा बैठक बोलविण्यात आली आहे. त्या बैठकीत योग्य पर्यायही निवडून बाजार सुरू केला जाणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील, याबाबत अडते, हमाल, तोलणार आणि टेम्पो चालकांकडून सुचनाही मागविण्यात आल्या आहेत. तसेच तरकारी, फळे, कांदा-बटाटा, केळी बाजार सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी गुरूवारी (ता.२८) पुन्हा बैठक बोलविण्यात आली आहे."

अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, "येत्या सोमवार (ता.१) पासून बाजार सुरू करण्याबाबत सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांचे एकमत झाले आहे. सर्व संघटनांनी बाजार सुरू करण्याची मागणी केली आहे."

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना व खबरदारी घेवून मार्केटयार्डातील तरकारी, फळे, कांदा-बटाटा, पान आणि केळी बाजार लवकरच सुरू केला जाणार आहे. गुरुवारी (ता.२८) होणाऱ्या बैठकीत बाजार कधी सुरू होणार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. -बी.जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com