विद्यार्थ्यांच्या 'क्रिएटिव्ह कॉन्फिडन्स'ला मिळतोय बुस्टर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

- शाळेत मिळालेले ज्ञान प्रत्यक्षात वापरासाठी प्रोत्साहित करणारा 'डिझाईन डेरिव्हेटिव्ह्ज' स्टार्टअप

पुणे : शाळा-कॉलेजमधील पुस्तकी ज्ञान हे विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्यासाठी गरजेचे आहे. मात्र या ज्ञानाचा वापर करून त्यांनी नवनव्या कल्पना व उत्पादने निर्माण करणे अपेक्षित असते. विद्यार्थ्यांच्या या सर्जनशील आत्मविश्वासाला (क्रिएटिव्ह कॉन्फिडन्स) बूस्टर देण्याचं काम 'डिझाईन डेरिव्हेटिव्ह्ज' हा स्टार्टअप करत आहे. केवळ दीड वर्षाच्या कालावधीतच स्टार्टअपद्वारे 750 विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला फुंकर घालण्यात आली आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Image may contain: 1 person, beard and glasses

नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेला दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा, ही कल्पना या स्टार्टअप मागे आहे. तोच उद्देश समोर ठेवून इंजिनिअर असलेले निनाद पानसे यांनी कोथरूडमधील मयुर कॉलनीत डिसेंबर 2018 साली हा स्टार्टअप सुरू केला. 10 ते 18 वर्षाच्या मुलांची सर्जनशीलता वाढविण्यासाठी 'इंटरनॅशनल डिझाइन ऑलिम्पियाड' ते आयोजित करतात. तसेच 'व्हर्च्युअल कोर्स ऑन क्रिएटिव्ह कॉन्फिडन्स' हा कोर्स त्यांनी तयार केला आहे.याबाबत पानसे सांगतात की, शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच नवीन कल्पना तयार करायच्या असे नाही. मुळात नवकल्पनेला कोणतेही वय नसते. 

 पुणेकरांनो, उद्या जरा जपून; हवामान खात्यानं दिला 'ऑरेंज अलर्ट'
चांगले मार्क मिळवलेले विद्यार्थी क्रिएटिव्ह असतीलच असे नाही. विचार करण्याची शक्ती, ज्ञान आणि अनुभव एकत्र आले की नवकल्पना निर्माण होते. याच बाबींचा विद्यार्थ्यांमध्ये मेळ घाल्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यातून अदभूत व कोणालाही वापरता येईल, अशी गोष्ट विद्यार्थ्यांकडून तयार करण्याचे काम सुरू आहे. 

Image may contain: one or more people and table

अशी सुचली कल्पना : 
पानसे हे 12 वर्ष अमेरिकेत एका अभियांत्रिकी कंपनीत नोकरी करत होते. पुण्यात आल्यानंतर ते एका डिझाइन स्कूलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्यरत होते. शाळेत स्किल व टुल सेट शिकवले जाते. मात्र, माइंड सेट शिकवले जात नाही. म्हणजे उपलब्ध साधनांचा वापर कसा करायचा हेच विद्यार्थ्यांना कळत नाही. कॉलेज किंवा नोकरीला गेल्यानंतर आपले कौशल्य वापरण्यापेक्षा शाळेतच या सगळ्यांची सवय व्हावी व त्यातून अधिक प्रगल्भ विद्यार्थी तयार व्हावेत, अशी कल्पना त्यांना सुचली. त्यातूनच या स्टार्टअपची सुरुवात झाली.

पुणे महापालिकेने पाणी कपातीबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय!
 

स्टार्टअपची वैशिष्ट्ये :
- विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह कॉन्फिडन्ससाठी प्रोत्साहन दिले जाते
- विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्यावर भर 
- तुमचे विचार महत्वाचे आहेत ते त्यांना पटवून दिले जाते
- कोणतीही कल्पना सुचल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी मदत
- विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह कॉन्फिडन्ससाठी प्रोत्साहन दिले जाते
- विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्यावर भर 
- तुमचे विचार महत्वाचे आहेत ते त्यांना पटवून दिले जाते
- कोणतीही कल्पना सुचल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी मदत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Design Derivatives Startup Gives Boost to Creative Confidence of Student