शिक्षक सोसायटी रस्त्यावरील खड्डे बुजवले

रमेश मोरे
शनिवार, 28 जुलै 2018

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील शिक्षक सोसायटी रस्त्यावरील रहदारीस धोकादायक ठरणारे खड्डे महापालिका स्थापत्य विभागाकडुन तात्काळ बुजविण्यात आल्याने नागरीकांकडुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. येथील शिक्षक सोसायटी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. यातच उताररस्ता असल्याने पावसाने हा रस्ता चिखलयमय झाला होता. पुणे औंधकडे ये-जा करण्यासाठी मुळा नदी किनारा रस्त्याबरोबरच या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

या रस्त्यावरच पुढे शाळा असल्याने विद्यार्थ्यांना चिखल व खड्यातुन शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागत होती. अनेकदा येथे वाहतुक कोंडी होवुन किरकोळ अपघात घडले होते. जेष्ठ नागरीक, विद्यार्थी यांना पायी चालणेही जिकिरीचे बनले होते. या बाबत शुक्रवार ता.27 सकाळ मधुन सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. बातमीची तात्काळ दखल घेत महापालिका स्थापत्य विभागाकडुन या रस्त्यावरील धोकादायक खड्डे डांबरखडी डस्ट टाकुन बुजविण्यात आल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे. 

Web Title: destroyed the potholes on the roads