पुणे - घरकुल परिसरात वाहनांची तोडफोड 

संदीप घिसे 
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पिंपरी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहरातील वाहनांच्या तोडफोडीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. चिखली येथील घरकुल परिसरामध्ये दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना मंगळवारी (ता.२४) सकाळी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार घरकुल परिसरात राहणारे बाळासाहेब दगडे यांचा एमएच-१२-एफ.झेड.-३८२२ आणि शेख यांचा एमएच-१४-व्ही-१५१३  हे दोन टेम्पो घरकुल परिसरात उभे होते. मध्यरात्री कुणीतरी या दोन्ही टेम्पोच्या काचा फोडल्या. याबाबत कोणतीही तक्रार निगडी पोलीस ठाण्यात देण्यात आलेली नाही. घरकुल परिसरात वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: destroying vehicles in Gharkul area