बोर्डिंग पासचे तपशील स्क्रीनवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे - प्रवाशांचा बोर्डिंग पास स्कॅन करून त्याला प्रवेश देणारे दोन ई-सिक्‍युरिटी गेट येत्या १५ दिवसांत लोहगाव विमानतळावर कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे बनावट बोर्डिंग पासच्या आधारे विमानात प्रवेश करण्यास प्रतिबंध होणार असून, सुरक्षा यंत्रणांवरील ताणही कमी होईल. तसेच, प्रवाशांचा रांगेतील वेळही कमी होणार आहे. 

पुणे - प्रवाशांचा बोर्डिंग पास स्कॅन करून त्याला प्रवेश देणारे दोन ई-सिक्‍युरिटी गेट येत्या १५ दिवसांत लोहगाव विमानतळावर कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे बनावट बोर्डिंग पासच्या आधारे विमानात प्रवेश करण्यास प्रतिबंध होणार असून, सुरक्षा यंत्रणांवरील ताणही कमी होईल. तसेच, प्रवाशांचा रांगेतील वेळही कमी होणार आहे. 

विमानतळावर प्रवेश केल्यानंतर प्रवासी बोर्डिंग पास घेतो. त्यानंतर तो सिक्‍युरिटी चेक इनसाठी जातो. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) तेथे तपासणी होते. त्यासाठी मोठी रांग असते. प्रवाशाने त्याचा बोर्डिंग पास सीआयएसएफच्या जवानाला दाखविल्यावर तो तेथील स्कॅनर समोर धरेल. त्या बोर्डिंग पासवरील तपशील आणि प्रवाशाची संपूर्ण माहिती, त्याच्या विमान प्रवासाचे तपशील तेथील एलईडी स्क्रीनवरील दिसतील. ते बरोबर असेल, तर त्या गेटवरील दिवे हिरव्या रंगाचे होईल आणि आपोआप उघडेल. 

प्रवासी पुढे गेल्यावर गेट पुन्हा बंद होणार असून, त्यावरील दिवे निळ्या रंगाचे होतील. या पद्धतीमुळे सीआयएसएफकडून होणाऱ्या तपासणीचा कालावधी कमी होणार आहे. त्यामुळे सिक्‍युरिटी चेक इनसाठी लागणारा प्रवाशांचा वेळही कमी होईल. 

प्रायोगिक तत्त्वावर हे दोन गेट गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बसविले होते. त्याची जानेवारी आणि एप्रिलमध्येही चाचणी घेण्यात आली. विमानतळ प्रवाशांसाठी हे गेट उपयुक्त असल्याचे दिसून आल्यामुळे लोहगाव विमानतळ प्रशासनाने त्याचा वापर कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वेळा प्रवासी बोर्डिंग पास घेऊन भलत्याच विमानात गेल्याचे उघड झाले आहे. या ई-सिक्‍युरिटी गेट स्कॅनरमुळे तसे आता होणार नाही, कारण सीआयएसएफच्या जवानाला संबंधित प्रवाशाच्या प्रवासाचेही तपशील मिळणार आहेत. येत्या १५ दिवसांत ही दोन्ही गेट कार्यान्वित होणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले.

विमानात बसण्यापूर्वीही ई-गेट 
विमानात प्रवास करण्यापूर्वीही विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून बोर्डिंगची तपासणी होते. तेथेही ई-सिक्‍युरिटी गेट स्कॅनर बसविण्यात येणार आहे. विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रकल्पात असे दहा गेट बसविण्यात येतील. तूर्त पहिल्या टप्प्यात आणखी दोन गेट दोन महिन्यांत कार्यान्वित होतील. अशा पद्धतीची यंत्रणा दिल्ली, हैदराबाद, बंगळूर विमानतळांवर आहे. आता ती लोहगाव विमानतळावरही उपलब्ध होत आहे.

Web Title: Details of boarding pass screen