नायगाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

पुणे - संत सावता माळी यांच्या श्री क्षेत्र अरण (ता. माढा) येथील समाधीस्थळाचा विकास करा. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे तसेच तेथे मुलींचे विद्यापीठ स्थापन करावे. मुलींची पहिली शाळा सुरू झालेल्या भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावे, या मागण्यांसाठी माळी समाजाच्या वतीने रविवारी रॅली काढण्यात आली. ‘जय ज्योती, जय क्रांती’च्या जयघोषात हजारो नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. निमित्त होते फुले दांपत्य सन्मान दिनाचे. 

क्रांतिसूर्य जोतिराव फुले फोरम ऑफ सोशिओ, कमर्शिअल ॲण्ड इंडस्ट्रीअल ॲक्‍टिव्हिटी (केजेफोसीआ) आणि माळी समाजाच्या विविध संस्थांनी रॅलीचे आयोजन केले होते. ‘केजेफोसीआ’चे अध्यक्ष अविनाश ठाकरे, संयोजक राजेंद्र गिरमे, अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्‍वस्त राजाभाऊ रायकर, माजी महापौर विठ्ठल लडकत, शिक्षण मंडळ सदस्य रवी चौधरी, माजी आमदार कमल ढोले पाटील, दीप्ती चवधरी, संत सावता माळी युवक संघाचे अध्यक्ष सचिन गुलदगड, उल्हास ढोले पाटील, कृष्णकांत कुदळे, खानदेश माळी महासंघाचे बी. एस. माळी, समता परिषदेचे रवींद्र चौधरी, आश्‍विन गिरमे, दीपक जगताप, जगन्नाथ लडकत, रेखा रासकर, मोहन लांडे, मिलिंद गिरमे या वेळी उपस्थित होते. 

फुले दांपत्यांच्या वेशभूषेतील कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थिनी, नायगाव येथील महिलांचे ढोलपथक, शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, वारकऱ्यांची दिंडीदेखील या रॅलीत सहभागी झाली होती. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मागण्यांचे फलक घेऊन नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: To develop tourism as Naigaon