विकसित करा ‘इंटरनॅशनल फायनान्स’चे कौशल्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

पुणे - ‘इंटरनॅशनल फायनान्स’विषयी मार्गदर्शनपर दोनदिवसीय वीकेंड प्रशिक्षण ता. २५ आणि २६ मार्चला आयोजिले आहे. प्रशिक्षणात इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टीम, बॅलन्स ऑफ पेमेंट, एस्क्‍चेंज रेट्‌स, थेट परकी गुंतवणूक (फॉरेन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट), मंडले फ्लेमिंग मॉडेल, ऑप्टिमम करंसी एरिया, परचेसिंग पॉवर पॅरिटी, इंटरेस्ट रेट पॅरिटी, इंटरनॅशनल फिशर रेट, हेजिंग/फॉरेन कॉन्ट्रॅक्‍ट, एक्‍सपोर्ट ॲन्ड इम्पोर्ट फायनान्स आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. 

उद्योजक, उत्पादक, निर्यातदार, निर्यात करणाऱ्या कंपन्यांचे वित्त व्यवस्थापक, जागतिक बाजारपेठेचा आढावा घेणारे, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, आंतरराष्ट्रीय मार्केटिंग प्रशिक्षण घेणारे एमबीएचे विद्यार्थी तसेच नव्याने आयात-निर्यात करू इच्छिणाऱ्यांसाठी प्रशिक्षण फायद्याचे आहे. प्रतिव्यक्ती चार हजार आठशे पन्नास रुपये शुल्क आहे. 
अधिक माहितीसाठी संपर्क -  ८८८८८३९०८२

‘देशी गोवंश संगोपनविषयी कार्यशाळा’

देशी गाईंचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन कसे करावे, देशी गाईंच्या जाती, गोशाळेचे व्यवस्थापन, गाईंमधील आजार व उपचार, गोवंश आधारित उत्पादने, शेण, गोमुत्रापासूनचे बनविता येणारे उपपदार्थ, गोवंश संवर्धनासाठीच्या शासनाच्या व बॅंकांच्या योजना आदींविषयी मार्गदर्शन करणारे ‘देशी गोवंश’ विषयाची दोनदिवसीय कार्यशाळा शुक्रवारपासून (ता.२४) सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर येथे सुरू होत आहे. यात लेखी विषयांच्या मार्गदर्शनाबरोबरच देशी गाईंच्या अद्ययावत गोशाळेस शिवारफेरीचे आयोजन आहे. प्रतिव्यक्ती तीन हजार रुपये शुल्क आहे.

ज्यांना गोवंश आधारित उत्पादने तयार करण्याचे सविस्तर फॉर्म्युले जाणून घ्यायचे आहेत, ते २६ मार्चला आयोजित प्रात्यक्षिक शिबिरात सहभागी होऊ शकतात. त्यासाठी प्रतिव्यक्ती पाच हजार रुपये शुल्क आहे. सकाळनगर, बाणेर रोड, पुणे येथे प्रशिक्षण होईल. 
अधिक माहितीसाठी संपर्क - ८६०५६९९००७ 

Web Title: developed the international finance skill