PNE19P12611_org.jpg
PNE19P12611_org.jpg

पुणे पॅटर्न विकसित करून आदर्श निर्माण करणार 

पुणे : शहरामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण या वर्षाअखेरपर्यंत 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करून वाहतूक शिस्तीचा पुणे पॅटर्न विकसित करत राज्यासमोर आदर्श निर्माण करणार, असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला. 

भारतीय कला प्रसारिणी सभा व वाहतूक शाखा पुणे शहर पोलिस यांच्या सयुंक्त विद्यमाने घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात आयोजित वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन डॉ. व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रदर्शन येत्या बुधवारपर्यंत (ता.13) सर्वांसाठी खुले राहणार आहे. यावेळी पोलिस उपायुक्त (वाहतूक शाखा) तेजस्वी सातपुते, भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव पुष्कराज पाठक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, महापालिका अतिक्रमण विभागप्रमुख माधव जगताप आदी उपस्थित होते. याप्रसंगी कामाक्षी कोनापुरे, प्रतीक्षा भरते, प्रतीक भुरावडे, श्रेया जोशी, ओमकार कुंजीर या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आला. 

वेंकटेशम म्हणाले, "जानेवारी 2018 आणि जानेवारी 2019 या महिन्यांतील अपघातांचे प्रमाण 44 टक्‍क्‍यांनी कमी झाले असून, येत्या काळात ते 50 टक्के करण्याचे उद्दिष्ठ आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), वाहतूक पोलिस आणि महापालिका मिळून कार्य करीत आहेत.'' शहरामध्ये हेल्मेट सक्ती नव्हे तर, शिस्त असली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

"वाहन चालवताना प्रत्येक चालक स्वतःला जगातील सर्वोत्तम चालक समजतो. मात्र, वाहन चालवणे ही एक कला असून ती आत्मसात करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे चालकांनी स्वतःला सर्वोत्तम चालक समजू नये,''असा सल्ला राऊत यांनी दिला.

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी चार 'ई' महत्त्वाचे आहेत. त्यात एज्युकेशन, इंजिनिअरिंग, एन्फोर्समेंट, इमर्जन्सी केअर. त्यातील एज्युकेशन आणि इमर्जन्सी केअर हे विषय अत्यंत महत्त्वपूर्ण हाताळणे गरजेचे असल्याचे सातपुते यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com