विकासासाठी सर्वतोपरी मदत करू - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

शेटफळगढे - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या परिसरातील गावांचा विकास होत आहे. त्यामुळे या परिसरातील मतदारांनी राष्ट्रवादीला प्रत्येक निवडणुकीत साथ दिली आहे. त्यामुळे यापुढील काळातही विकासाच्या संबंधी कामांना आपण सर्वतोपरी मदत करू.’’ असे आश्‍वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. गुरुवारी (ता. १९) ला सुळे यांनी शेटफळगढे पंचायत समिती गणातील लामजेवाडी, निरगुडे, म्हसोबावाडी, लाकडी, शिंदेवाडी, काझड, निंबोडी, अकोले या गावांना भेटी दिल्या व ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.

शेटफळगढे - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या परिसरातील गावांचा विकास होत आहे. त्यामुळे या परिसरातील मतदारांनी राष्ट्रवादीला प्रत्येक निवडणुकीत साथ दिली आहे. त्यामुळे यापुढील काळातही विकासाच्या संबंधी कामांना आपण सर्वतोपरी मदत करू.’’ असे आश्‍वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. गुरुवारी (ता. १९) ला सुळे यांनी शेटफळगढे पंचायत समिती गणातील लामजेवाडी, निरगुडे, म्हसोबावाडी, लाकडी, शिंदेवाडी, काझड, निंबोडी, अकोले या गावांना भेटी दिल्या व ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. या वेळी बोलताना सुळे पुढे म्हणाल्या, ‘‘सध्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. कष्ट करून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. वृद्ध, निराधार लोकांना प्रति महिन्याला पैसे मिळत नसल्याने या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लोकांना आता भाजपाला मतदान देऊन खूप मोठी चूक केल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत हे मतदार गतवेळीची चूक सुधारून राष्ट्रवादीला मतदान करतील.’’

तत्पूर्वी लामजेवाडीत बाजार समितीचे माजी सभापती हनुमंतराव वाबळे यांनी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना या जिरायती भागासाठी कशी होणे गरजेचे आहे. याविषयी माहिती देत ही योजना मार्गी लावण्याची मागणी केली. तसेच, या वेळी सरपंच हेमलता भोसले, विजय धुमाळ, माऊली भोसले यांचीही भाषणे झाली. तर निरगुड्यात रोहित हेळकर यांनी म्हसोबावाडीत उपसरपंच स्नेहदीप नांदगुडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने गावच्या विकासाशी संबंधी व नवीन विकास कामासंबंधी मनोगते व्यक्त केली. 

या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, किसनराव जावळे, कार्याध्यक्ष अमोल भिसे, युवकाध्यक्ष सचिन सपकळ, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, म्हसोबावाडीच्या सरपंच रूपाली खंडाळे, निरगुड्याचे माजी सरपंच विजयराव भोसले यांचेसह विविध गावचे ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Web Title: development help by supriya sule