महाराष्ट्राचा विकास हा खरा राष्ट्रवादीचा ध्यास : खा. सुप्रिया सुळे 

प्रा. प्रशांत चवरे
बुधवार, 27 जून 2018

भिगवण : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांमुळे ऊस व दुध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकरी व अन्य घटकांच्या पाठीशी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार विरुद्ध राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. महाराष्ट्राचा विकास हा खरा राष्ट्रवादीचा ध्यास आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्यापाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. 

भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद मतदार संघातील डिकसळ (ता.इंदापुर) येथे गावभेट कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, डी.एन. जगताप, विजयराव शिंदे, सचिन सपकळ, अनिल बागल, सचिन बोगावत, तेजस देवकाते, विजयकुमार गायकवाड उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, इंदापुर तालुका विशेषतः भिगवण जिल्हा परिषद गटातील लोकांनी मोठी ताकद राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या मागे उभी केली आहे. माजी उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांचे इंदापुर तालुक्यावर विशेष प्रेम असुन आमदार भरणे, प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये मोठी विकासकामे सुरु आहेत.  

विजयकुमार गायकवाड यांनी गावाच्या वतीने धरणग्रस्त शेरा कमी करण्यात यावा, दशक्रिया विधी घाट रस्ता दुरुस्त करण्यात यावा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे संरक्षक भितींचे बांधकाम आदी मागण्या केल्या. खासदार सुळे यांनी ग्रामस्थांच्या मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर काळे यांनी केले, सुत्रसंचालन रावसाहेब गवळी यांनी केले तर आभार अर्जुन सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन जिजाराम पोंदकुले, रावसाहेब गवळी, संदीप पाटील, आबासाहेब हगारे आदींनी केले. 

Web Title: The development of Maharashtra is the true moto of NCP: MP Supriya Sule