पवनेच्या तीरी... निसर्ग आला दारी... 

दीपेश सुराणा
गुरुवार, 12 जुलै 2018

पिंपरी - वाढत्या शहरीकरणाबरोबर वृक्षतोड वाढली आहे. पक्ष्यांचा किलबिलाट कुठेतरी हरवला आहे. निसर्गाला जवळून अनुभवण्यासाठी डोंगरदऱ्यांमध्ये किंवा रानोमाळ भटकण्यासाठी बदलत्या जीवनशैलीत वेळ उरलेला नाही. अशा परिस्थितीत महापालिकेने चिंचवडगाव येथे पवना नदीकिनारी उभारलेल्या जिजाऊ पर्यटन केंद्रात मात्र "निसर्ग आला दारी' असेच चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. 

पिंपरी - वाढत्या शहरीकरणाबरोबर वृक्षतोड वाढली आहे. पक्ष्यांचा किलबिलाट कुठेतरी हरवला आहे. निसर्गाला जवळून अनुभवण्यासाठी डोंगरदऱ्यांमध्ये किंवा रानोमाळ भटकण्यासाठी बदलत्या जीवनशैलीत वेळ उरलेला नाही. अशा परिस्थितीत महापालिकेने चिंचवडगाव येथे पवना नदीकिनारी उभारलेल्या जिजाऊ पर्यटन केंद्रात मात्र "निसर्ग आला दारी' असेच चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. 

येथे दुसऱ्या टप्प्यात अडीच एकरमध्ये सुरू असलेल्या कामात 400 ते 500 झाडे लावण्यात येणार आहे. तसेच, नदीपात्राला लागून थेरगाव घाटापर्यंत नागरिकांना फिरण्यासाठी पाथ-वे तयार केला जात आहे. त्याशिवाय, "हिरवे हिरवे गार गालिचे... हरित तृणांच्या मखमालीचे..' या बालकवींच्या कवितेप्रमाणे सुखद अनुभव देणाऱ्या हिरवळीचे आच्छादन या पर्यटन केंद्रात केले जात आहे. त्यामध्ये पवना नदीपात्र, नदीपात्रातील बदक आणि अन्य पक्षांचा मुक्त विहार अनुभवण्यासाठी व्ह्यूवींग गॅलरी, थेरगाव घाटापर्यंत चालण्यासाठी "पाथ-वे' अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यासाठी अडीच कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामाला 8 महिन्यांपूर्वी सुरवात झाली. सध्या हे काम वेगाने सुरू आहे. 

पर्यटन केंद्रात पहिल्या टप्प्यात साडेपाच एकर क्षेत्रात मुलांसाठी खेळणी, खुली व्यायामशाळा, खुला रंगमंच, स्केटिंग रिंग, आच्छादित हिरवळ, पिण्यासाठी पाणी, स्वच्छतागृह, फिरण्यासाठी "पाथ-वे' आदी सुविधा आहेत. त्यासाठी सुमारे 8 कोटी रुपये इतका खर्च झाला. 1 एकर क्षेत्राचा ताबा न मिळाल्याने उर्वरित अडीच एकर क्षेत्रात दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. पर्यटन केंद्राचे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात उद्‌घाटन झाले. त्यानंतर नागरिकांसाठी हे केंद्र खुले करण्यात आले. सुट्टीच्या दिवशी तसेच, दररोज सकाळी आणि सायंकाळी येथे व्यायामासाठी आणि फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. 

जिजाऊ पर्यटन केंद्रातील दुसऱ्या टप्प्याचे काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर, संबंधित भाग देखील नागरिकांसाठी खुला केला जाईल.'' 
- चंद्रशेखर धानोरकर, उप-अभियंता, महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: development near pawana river