'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'

युनूस तांबोळी
सोमवार, 23 एप्रिल 2018

टाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी दिली.

चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात कारेगाव-रांजणगाव गणपती गटाची प्रभाग समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी पाचुंदकर होत्या. या वेळी सभापती सुभाष उमाप, पंचायत समिती सदस्य विश्वास कोहकडे, गटविकास अधिकारी संदीप जठार, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, विविध विभागांचे अधिकारी, सरपंच आदी उपस्थित होते.

पाचुंदकर म्हणाल्या, "पंचायत विभागाला आर्थिक नियोजनातून 133 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाला 23 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वाचनसंस्कृती वाढावी यासाठी पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांत ग्रंथालय सुरू केले जाणार आहे.''

ग्रामसेवक पद्मिनी कौठुळे, संतोष गायकवाड, बाळासाहेब शेळके यांचा शंभर टक्के करवसुली केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेद्र लष्करे यांनी केले. आभार सरपंच रूपाली धुमाळ यांनी मानले.

अधिकाऱ्यांची बैठकीकडे पाठ
या बैठकीला आरोग्य केंद्राचे अधिकारी हजर नव्हते, तसेच समाजकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली. "बांधकामाची कामे झाली म्हणजे विकास झाला असे नाही. सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर सगळ्यांनी एकत्रित लक्ष दिले पाहिजे. ठेकेदार उपठेकेदार नेमून अनेक विकास कामे निकृष्ट दर्जाची करत आहेत. अधिकाऱ्यांनी कामांकडे लक्ष द्यावे,' अशी अपेक्षा या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Web Title: Development of village should be given in Gram Sabha 1st May