वानवडीमध्ये विकासाची गंगा : महापौर जगताप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

वानवडी प्रभाग क्र. 25 मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार महापौर प्रशांत जगताप यांच्या पॅनेलमध्ये माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, दिलीप जांभूळकर व कांचन जाधव हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

हडपसर - "सर्व जाती-धर्मांतील आणि तळागाळातील व्यक्ती केंद्रबिंदू मानून विकासकामे केली. कामे करताना नागरिकांचे हित, गरजा ओळखून त्याला प्राधान्यक्रम दिला, त्यामुळे नागरिक, कार्यकर्ते सदैव साथ देऊन पाठीशी उभे आहेत. विकासाची गंगा वानवडीमध्ये नागरिकांना दिसत आहे,'' असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रभाग क्र. 25 चे उमेदवार महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

वानवडी प्रभाग क्र. 25 मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार महापौर प्रशांत जगताप यांच्या पॅनेलमध्ये माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, दिलीप जांभूळकर व कांचन जाधव हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी विकासनगर, जगतापनगर, दिव्यानगर, जांभूळकर चौक परिसरात पदयात्रा काढली. या भागात राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून भूमिगत विद्युत तारा, एलईडी पथदिवे, मोठ्या व्यासाच्या पिण्याच्या पाण्याच्या लाइन टाकण्याची कामे केली आहेत. अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले आहे. राष्ट्रवादीच्या विकासकामांमुळे नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पदयात्रेत उदय गायकवाड, नैना कैतवाल, इकबाल शहा, किसनराव सनके, बाळासाहेब घोमण, विनोद कांबळे, माणिकराव गव्हाणे, मीरू गव्हाणे, विकास भानुसघरे, नैना कोतवाल, डॉ. मेन्डोसा, सय्यद मॅडम, सुभाष काळे, उमेश सुतार, शरीफ इनामदार, शोभा शिंदे, अनिता सूर्यवंशी, कल्पना शिंदे, दत्तात्रेय सोनार, विलास ताकवले, संजय परदेशी, किसनराव साळुंखे, चंद्रकांत सपकाळ, अनिल सावंत, राजेंद्र कोतवाल, नामदेव भानुसघरे अनंतराव शेलार यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.

पदयात्रेदरम्यान विकासकामांची माहिती देताना उमेदवारांकडून नागरिकांच्या पुढील विकासकामांच्या सूचनाही ऐकून घेतत्या जात आहेत. विकासकामांचा अजेंडा घेऊन प्रचारात उतरलेले कार्यकर्ते आमच्या चारही उमेदवारांचा विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास उमेदवारांनी व्यक्त केला.

Web Title: development in wanwadi says prashant jagtap