कोंढवे धावडे येथे विविध कामांचे भूमिपूजन

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 1 मे 2018

"रस्ते दुरुस्ती व पथ दिवे या संदर्भात खोदाईची कामे असल्याने ही कामे पावसाळ्या पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शाळेच्या मनोरंजन केंद्राचे काम देखिल सहा महिन्यात पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे." असे सरपंच नितीन धावडे यांनी सांगितले.

कोंढवे धावडे : येथे १४व्या वित्त आयोगामधून 28लाख रुपयांच्या कामाची सुरुवात आज सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या हस्ते करण्यात आली. 

जिल्हा परिषद  शाळा येथे करमणूक सभागृह बांधण्यात येणार आहे. त्यासाठी १८ लाख रुपये तर भीमनगर व भैरवनाथ नगर येथे चौकात पथ दिवे बसविण्यासाठी 10 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. 

तर ग्रामपंचायत निधी मधून खडकवस्ती व गावठाण येथे रस्ते दुरुस्तीसाठी तीन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यावेळी सरपंच नितीन धावडे, उपसरपंच धनंजय मोकाशी, सदस्य बजरंग धावडे, सुनित लिंबोरे, अविनाश सरोदे, राजु राठोड, समिर दामगुडे, नवनाथ धावडे, सोनिया धावडे, रेश्मा धावडे, सुचिता गायकवाड, कल्पना मोकाशी, शोभा मोकाशी, स्नेहल धावडे व ग्रामस्थ लक्ष्मण धावडे पाटील, सोपान धावडे, पोलीस पाटील अतुल धावडे, माजी उपसरपंच अतुल धावडे, दीपक धावडे, अमोल धावडे, सागर धावडे, श्याम धावडे, रवींद्र मोकाशी, मोहन धावडे, प्रविण लांडगे, प्रशांत लांडगे उपस्थित होते. 

"रस्ते दुरुस्ती व पथ दिवे या संदर्भात खोदाईची कामे असल्याने ही कामे पावसाळ्या पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शाळेच्या मनोरंजन केंद्राचे काम देखिल सहा महिन्यात पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे." असे सरपंच नितीन धावडे यांनी सांगितले.

Web Title: development work in Kondhwe Dhavde