केशवनगरमध्ये विकासकामे ठप्प

kailas2.JPG
kailas2.JPG

पुणे (मुंढवा) - गेल्या काही दिवसांपासून केशवनगर परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील विविध सोसायट्या व संस्थांकडे जाणारे रस्ते खड्ड्याने व्यापले आहेत. त्यात पाणी साठले असून खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वारांचे नियमीत अपघात होत आहेत, महापालिकेने त्वरित या रस्त्यांच्या दुरुस्तीसह विकासकामे सुरू करावीत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकारी अशोक येवले यांनी दिला आहे. 

येथील रेणुकामाता मंदिराकडून मांजरी रस्त्याला मिळणारा रस्ता, फ्लोरिडा रिव्हर बॅन्क आणि मंत्रा सोसायटी समोरून नदीकडे जाणा-या रस्त्यांवर पाणी साठले आहे. खड्ड्यांमध्ये भर घालण्यासाठी टाकलेले दगड वर आले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकांना मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागत आहे. काही महिला चालकांना अपघात झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. 

अकरा गावांचा गेल्या चार वर्षापूर्वी महापालिकेत समावेश होऊन देखील या भागातील नागरी समस्या दूर करण्यासाठी कोणतेही ठाम धोरण महापालिकेकडून ठरवले जात नाही. रहिवाशांकडून कर मात्र वसूल केला जात आहे, मात्र सुविधा देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गावातील विविध विकास कामे महापालिकेने त्वरित सुरू करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com