सासवडला कऱहेकाठी दगडी घाट बांधणीचा शुभारंभ

सासवडला कऱहेकाठी दगडी घाट बांधणीचा शुभारंभ

सासवड, (ता.पुरंदर, जि. पुणे) : साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद के. अत्रे यांच्या सासवड (ता. पुरंदर) या जन्मगावच्या कऱहेकाठी संगमेश्वर मंदिर परिसरातील जलपर्णी काढणे, गाळ काढणे व सौंदर्यात भर घालणारा दगडी घाट बांधण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सुमारे 22 लाख रुपये खर्चाचे हे एकूण काम आहे.  

शिवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने संगमेश्वर येथे दगडी घाट बांधण्याचे काम हाती घेतले. या 16 लाख खर्चातील 5 लाखांचा भार संजय जगताप यांनी चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ उचलला आहे. बाकी रक्कम प्रतिष्ठान खर्च करेल. तर गाळ काढण्याचे काम लोकसहभागातून सुरु केले आहे. त्यास सढळ हाताने मदतीचे यावेळी आवाहन केले आहे.

त्याशिवाय संगमेश्वर मंदिराकडे जाणारा पुल दुरुस्ती व त्यावर सिमेंटएेवजी लाकडी आवरण टाकण्यासाठी लाखभर रुपये खर्च केले जातील, अशी माहिती सासवडकर ग्रामस्थांच्या वतीने संजय जगताप यांनी दिली.

या कार्यक्रमास नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप व नगरसेवक, गिरीश जगताप, संजय चव्हाण, गोविंद बोत्रे, दिलीप गिरमे, अप्पासाहेब पुरंदरे, पप्पूशेठ भोंगळे, डाॅ. भरत तांबे, भरत चौखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र जगताप यांनी केले. 

यापूर्वीही प्रयत्न.. आता तिसरी वेळ चांगल्या यशाची
तत्कालीन डीवायएसपी नेताजी डांगे यांनी संगमेश्वर बंधाऱयातील सर्वप्रथम 15 वर्षांपूर्वी गाळ काढला होता. तर अजय मंडळाचे अध्यक्ष प्रविण पवार यांच्या एक लाख रुपयांच्या मदतीने 2012 मध्येही पुन्हा गाळ काढला होता. आता गाळ काढण्याचा हा तिसरा प्रयत्न होत आहे. त्यास आणखी चांगले मिळण्याची अपेक्षा आहे. 

मदत संकलन..
संगमेश्वर परिसर सुधारणेचे एकूण काम 22 लाख रुपये खर्चाचे आहे. आता चंदुकाका जगताप स्मरणार्थ 5 लाख, तसेच हरेश्वर पतसंस्थकडून 100 लिटर्स डिझेल, स्वामी समर्थतर्फे व गोविंद बोत्रेंतर्फे प्रत्येकी 25 लिटर्स डिझेल, पुरंदरे ज्वेलर्सकडून 5 हजार, माऊली जगताप व मित्रांतर्फे 4 हजार रुपये अशी मदत गोळा झाली. अजूनही पालिका नगरसेवक व प्रमुख व्यावसायिक, नागरीक, ग्रामदैवत देवस्थान.. मदत संकलीत करु शकतात. क वर्ग पालिका जलयुक्त शिवार अभियानात आहेत, तेथूनही पालिका मदत मिळवू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com