विकासकामे अतिक्रमण करण्यासाठीच?

चिंचवडगाव - क्रांतिवीर चापेकर उड्डाण पुलाखाली रस्त्यावरच रिक्षाचे टपरीत रूपांतर करून सुरू असलेला व्यवसाय.
चिंचवडगाव - क्रांतिवीर चापेकर उड्डाण पुलाखाली रस्त्यावरच रिक्षाचे टपरीत रूपांतर करून सुरू असलेला व्यवसाय.

पिंपरी - शहरात अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात येत आहे. मात्र, त्याला कोणीही जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे करदात्या नागरिकांच्या पैशातून केलेली विकासकामे ही रस्ते, पदपथ, उड्डाण पुलांखाली व्यवसाय करणाऱ्यांच्या वापरासाठी आहेत का, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

शहरातील विकासकामांवर महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, त्याचा वापर अनेकजण अयोग्य पद्धतीने करीत आहेत. वाल्हेकरवाडी कॉर्नरला पदपथाचा वापर हा पार्किंगसाठी केला जात आहे. पुढे याच वळणावर ठेकेदाराने रस्त्याच्या उंचीबरोबरच पदपथ घेतला आहे. त्यामुळे टेंपो व्यावसायिक तेथून सहजपणे ये-जा करतात. चापेकर चौकातील उड्डाण पुलाखाली हीच स्थिती आहे. तेथे काही महिन्यांपासून तीनचाकी टेंपोद्वारे महिला व्यवसाय करीत आहे. तसेच, शहरातील बहुतांश व्यावसायिकांनी टेंपोची रचनाच दुकानासारखीच करून घेतली आहे. दरम्यान, कोणताही खाद्यपदार्थांचा व्यवसाय करताना संबंधित व्यावसायिकाला अन्न आणि औषध विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. मात्र, अनेक व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करीत असल्याने अशा व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कारवाईला थंड प्रतिसाद 
रस्त्यावर बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध पालिकेकडून नेहमीच कारवाई केली जाते. मात्र, या वाहनांचा वापर करून बेकायदा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या परिसरात अशा पद्धतीने एक हजार ५०० हातगाड्या, ५० ते ६० टेंपो जप्त करण्यात आले आहेत. त्यानंतरही सुमारे ५० टक्के नागरिक त्यांच्या वाहनांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करताना दिसून येत आहेत, असे अतिक्रमणविरोधी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com