सॅलिसबरी पार्क प्रकरणात देवेंद्र फडणवीस लक्ष घालणार

सॅलिसबरी पार्क येथील महापालिकेच्या उद्यानाच्या नामांतर प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Salisbury Park Case | Devendra Fadnavis News
Salisbury Park Case | Devendra Fadnavis Newssakal
Summary

सॅलिसबरी पार्क येथील महापालिकेच्या उद्यानाच्या नामांतर प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पुणे - सॅलिसबरी पार्क (Salisbury Park) येथील महापालिकेच्या उद्यानाच्या (Municipal Garden) नामांतर प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमच्या शिष्टमंडळाला मंगळवारी दिले. हा प्रश्न तातडीने सोडविणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

सॅलिसबरी पार्क येथील महापालिकेच्या नव्या उद्यानाला माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी त्यांच्या वडिलांचे नाव दिले आहे. त्याला परिसरातील रहिवाशांचा तसेच सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमचा विरोध आहे. त्यासाठी गेल्या चार आठवड्यांपासून त्यांचा संघर्ष सुरू आहे. फडणवीस पुणे दौऱ्यावर आले असताना फोरमच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी, ‘उद्यान, त्याचे नामांतर आणि नागरिकांचा विरोध, या बाबतची माहिती माझ्यापर्यंत पोचली आहे. याबाबत यापूर्वीही मी भिमाले यांच्याशी बोललो आहे. आज लगेच बोलून हा प्रश्न सोडविणार आहे,’ असे त्यांनी सांगितल्याची माहिती शिष्टमंडळाच्या विनिता देशमुख, गोपेश मेहता यांनी दिली.

या उद्यानासाठी फोरमच्या सदस्यांनी ४० वर्षे लढा दिला. तसेच त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केल्या होत्या. तसेच उद्यानासाठी आरक्षित असलेला भूखंड बांधकाम व्यावसायिकाला देण्याचा डावही नागरिकांनी हाणून पाडला, अशी माहिती फडणवीस यांना फोरमने दिली.

दरम्यान, उद्यानाचे नाव बदलून ते ‘पुणे महानगरपालिका उद्यान’ असे होत नाही तोपर्यंत नागरिकांचा लढा सुरूच राहणार आहे. लोकभावनेची दखल घेऊन या बाबतचा निर्णय तातडीने घ्यावा, असे फोरमचे अध्यक्ष फैजल पूनावाला यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com